पावसाळा ऋतू जितका सुखद आणि आनंददायी वाटतो, तितकाच तो अनेक समस्या देखील घेऊन येतो. पावसाळ्यात वातावरणात भरपूर प्रमाणात ओलावा, दमट हवा असल्याने अनेक शारीरिक समस्या सतावतात. या अनेक समस्यांमध्ये, महिलांना (4 Home remedies for vaginal and vulvar itching during rainy season) सतत सतावणारी आणि फारच कॉमन असलेली एक समस्या म्हणजे गुंप्तांगाच्या भागात खाज, रॅशेज होणे. पावसाळ्यात बहुतेकदा अनेक महिलांना ही समस्या फार त्रास देते(4 Instant Home Remedies For Private Part Itching During Rainy Season).
पावसाळ्यात ओलावा, सतत येणारा घाम, अधिक घट्ट किंवा ओलसर कपडे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष अशा कारणांमुळे संवेदनशील भागात इन्फेक्शन होऊन खाज, आग किंवा जळजळ होऊ शकते. पावसाळ्यात बरेचदा आपण पावसात भिजून ओलेचिंब होतो. अशा परिस्थितीत, जर ओले कपडे आपण बराच वेळ तसेच अंगावर ठेवले तर त्वचेला बुरशीजन्य (4 Home remedies for vaginal and vulvar itching during rainy season) इन्फेक्शन होऊन खाज, लालसरपणा, किंवा दुर्गंधी येऊ शकते. यासाठीच, पावसाळ्यात गुप्तांगाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय खूपच उपयुक्त ठरतात. पावसाळ्यात गुप्तांगातील खाज कमी करण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय नेमके काय आहेत ते पाहूयात.
पावसाळ्यात गुप्तांगांभोवती येणारी खाज कमी करण्यासाठी उपाय...
१. कडुलिंबाचे पाणी :- कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म गुप्तांगाभोवती येणारी खाज आणि रॅशेजपासून आराम देण्यास मदत करतात. यासाठी १० ते १५ कडुलिंबाची पाने घ्या आणि २ कप पाण्यात चांगली उकळा. पाणी कोमट झाल्यावर, त्या पाण्याने गुप्तांगाच्या आजूबाजूची जागा धुण्यासाठी वापरा. दिवसातून दोनदा हा उपाय केल्याने खाज, जळजळ आणि इन्फेक्शनपासून खूप आराम मिळतो. हा घरगुती उपाय खूप फायदेशीर असून त्वचेचा संसर्ग पसरण्यापासूनही प्रतिबंध करतो.
काळीकुट्ट दिसते पाठ ? ५ टिप्स, पाठ दिसेल स्वच्छ आणि खाज फोडही येणार नाहीत...
२. खोबरेल तेल व कापूर वडी :- खोबरेल तेलात नैसर्गिक अँटीफंगल गुणधर्म असतात, तर कापूर थंडावा देऊन खाज आणि जळजळ कमी करतो. यासाठी एक चमचा खोबरेल तेलात चिमूटभर कापूर मिसळा आणि खाज येत असलेल्या जागी हलक्या हाताने लावा. हा उपाय खाज लवकर कमी करण्यास आणि त्वचेला संसर्गापासून वाचवण्यात मदत करतो. मात्र, नारळाच्या तेलात कापूरचं प्रमाण खूपच कमी असावं, कारण जास्त प्रमाणात कापूर लावल्यानं त्वचेला जळजळ होऊ शकते. त्यामुळे हा उपाय काळजीपूर्वक करावा.
३. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेल नैसर्गिकरित्या त्वचेला थंडावा देते आणि त्वचेचा संसर्ग रोखण्यास मदत करतो. यासाठी कोरफडीच्या ताज्या पानातून जेल काढा आणि खाज येत असलेल्या जागी हलक्या हाताने लावा. दिवसातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्याने खाज आणि पुरळ येण्याचे प्रमाण कमी होते. ज्यांची त्वचा खूप संवेदनशील आहे, त्यांच्यासाठीही हा घरगुती उपाय सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो.
१ चमचा गुलकंद ठेवतो 'या' ७ समस्यांपासून दूर! महिलांनी गुलकंद खाण्याचे फायदे अनेक...
४. बेकिंग सोडा :- बेकिंग सोडा त्वचेची खाज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतो. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा थोड्या पाण्यात विरघळवून घ्या आणि खाज येत असलेली जागा त्या पाण्याने स्वच्छ धुवा. दिवसातून एकदाच हा उपाय करणं योग्य आहे. बेकिंग सोडाचा जास्त वापर करू नका, कारण त्यामुळे त्वचेला कोरडेपणा येऊ शकतो.
इतरही गोष्टी लक्षात ठेवा...
१. दिवसातून किमान दोन वेळा प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता करा आणि नेहमी स्वच्छ धुतलेला टॉवेल वापरा.
२. सौम्य, pH संतुलित वॉशचाच वापर करा, हार्श किंवा हानिकारक रासायनिक साबण वापरणे टाळा.
३. प्रत्येकवेळी लघवी झाल्यावर प्रायव्हेट पार्ट् पूर्णपणे स्वच्छ करा आणि कोरडा ठेवा.
४. नेहमी हलके व सैल कपडे घाला, जे त्वचेला श्वास घेऊ देतील आणि त्वचेवर ओलावा राहणार नाही.
५. पावसाळ्यात घट्ट कपडे घालणे टाळा, यामुळे घाम आणि दमटपणा वाढून संसर्ग होण्याची शक्यता वाढते.