Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शुगर नियंत्रणात ठेवणारे ४ पदार्थ, नियमित खा आणि शुगर वाढल्याने होणारे त्रास टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2026 08:40 IST

4 foods that keep sugar under control, eat regularly and avoid problems due to high sugar levels , health care tips : शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी खा हे पदार्थ.

आजकाल बदललेली जीवनशैली, सततचे बसून काम, कमी व्यायाम आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे डायबिटीसची समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. एकदा रक्तातील साखरेची पातळी वाढू लागली की आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे ठरते. (4 foods that keep sugar under control, eat regularly and avoid problems due to high sugar levels , health care tips )औषधांसोबतच काही नैसर्गिक पदार्थ आहारात घेतल्यास शरीराला फायदा होऊ शकतो. अनेक पारंपरिक पदार्थ असे आहेत जे डायबेटिस नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात असे मानले जाते. तुम्हाला मधुमेहाचा त्रास नसला तरी आहारात हे पदार्थ घ्या.

कारलं हे डायबेटिससाठी सर्वात जास्त ओळखले जाणारे पदार्थांपैकी एक आहे. कारल्याची चव कडू असली तरी त्यातील गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. अनेक लोक सकाळी कारल्याचा रस पितात किंवा कारल्याची भाजी नियमित खातात. कारल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे कडू असले तरी आहारात असावे.


 
डाळिंब हे पौष्टिक आणि ताजेतवाने फळ मानले जाते. डाळिंबामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात. योग्य प्रमाणात डाळिंब खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अनेक लोक संतुलित आहाराचा भाग म्हणून डाळिंब खातात. आवळा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. काही लोक आवळ्याचा रस, मुरांबा किंवा पावडर नियमित घेतात. आवळा शरीराची प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतो आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयोगी मानला जातो.

मेथी हे ही डायबिटीसमध्ये फायदेशीर समजले जाते. मेथीमध्ये फायबर भरपूर असते. मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाण्याची पद्धत अनेक घरांमध्ये आजही दिसते. काही जण मेथीची भाजी किंवा मेथी पावडरही आहारात घेतात. जांभूळ हे फळ डायबिटीसवर पारंपरिकरीत्या उपयोगी मानले जाते. जांभूळ खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. काही लोक जांभळाच्या बियांची पावडरही वापरतात. उन्हाळ्यात हे फळ मोठ्या आवडीने खाल्ले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Four Foods to Control Sugar: Eat Regularly, Avoid Diabetes Complications

Web Summary : Manage diabetes with lifestyle changes and natural foods. Bitter gourd, pomegranate, amla, fenugreek, and Java plum can help control blood sugar levels. Incorporating these into your diet may assist in preventing diabetes-related issues and promoting overall health.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स