Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोषणतज्ज्ञ सांगतात, कायम लक्षात ठेवा ३ नियम, बद्धकोष्ठतेच्या समस्येतून होईल सुटका - सकाळी वाटेल फ्रेश!

पोषणतज्ज्ञ सांगतात, कायम लक्षात ठेवा ३ नियम, बद्धकोष्ठतेच्या समस्येतून होईल सुटका - सकाळी वाटेल फ्रेश!

3 Rule For Old Constipation Clear Stomach Better Digestion : Constipation Cure Formula : 1 Remedy To Relieve Constipation : बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी पोषणतज्ज्ञ सांगतात सोपे ३ नियम, ज्याला त्यांनी HMF नियम असे म्हटले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2025 08:46 IST2025-05-24T07:25:28+5:302025-05-24T08:46:42+5:30

3 Rule For Old Constipation Clear Stomach Better Digestion : Constipation Cure Formula : 1 Remedy To Relieve Constipation : बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी पोषणतज्ज्ञ सांगतात सोपे ३ नियम, ज्याला त्यांनी HMF नियम असे म्हटले आहे.

3 Rule For Old Constipation Clear Stomach Better Digestion Constipation Cure Formula 1 Remedy To Relieve Constipation | पोषणतज्ज्ञ सांगतात, कायम लक्षात ठेवा ३ नियम, बद्धकोष्ठतेच्या समस्येतून होईल सुटका - सकाळी वाटेल फ्रेश!

पोषणतज्ज्ञ सांगतात, कायम लक्षात ठेवा ३ नियम, बद्धकोष्ठतेच्या समस्येतून होईल सुटका - सकाळी वाटेल फ्रेश!

'बद्धकोष्ठता' ही पोट आणि पचनाशी संबंधित अगदी कॉमन समस्या आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणांना सकाळी उठल्यावर पोट साफ न होण्याची समस्या सतावते. या समस्येत अनेकांना शौचास त्रास होतो, मालत्याग करणे कठीण जाते. ही समस्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पुरेसे पाणी पिण्याचा अभाव (Constipation Cure Formula) आणि एक्सरसाइज न केल्यामुळे उद्भवते. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा चयापचय क्रियेचा (1 Remedy To Relieve Constipation) वेग मंदावतो. मंद चयापचय क्रिया म्हणजे खाल्लेले अन्नपदार्थ मंद गतीने पचवले जातात. जर पचनक्रिया मंद असेल मलत्याग करणे कठीण होते, ज्यामुळे ते शरीराबाहेर टाकण्यास खूप त्रास होतो(3 Rule For Old Constipation Clear Stomach Better Digestion).

आपल्यापैकी अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. वेळच्यावेळी पोट साफ न होणं यामुळे केवळ अस्वस्थताच निर्माण होत नाही, तर यामुळे त्वचा, मूड आणि एकूण आरोग्यावरही परिणाम होतो. जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकालीन 'बद्धकोष्ठतेची' समस्या असेल तर त्याचा खूप त्रास होतो, याचा त्या व्यक्तीवर मानसिकदृष्ट्या देखील वाईट परिणाम होतो. इंडियन एक्सप्रेसमधील पोषणतज्ज्ञ पूजा मखीजा यांनी बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळविण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी मार्ग सुचवला आहे, ज्याला त्यांनी HMF नियम असे म्हटले आहे. बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी नेमका काय आहे हा नियम ते पाहूयात. 

बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी काय आहे नियम ?

पूजा मखीजा यांनी बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तीन नियम सांगितले आहेत, त्याला HMF म्हणतात. यामध्ये, H म्हणजे हायड्रेशन म्हणजे भरपूर पाणी पिणे आणि M म्हणजे मूवमेंट म्हणजे भरपूर व्यायाम करणे, आणि F म्हणजे फायबर. म्हणजे भरपूर हिरव्या पालेभाज्या खाणे. 

तुळशीची पाने रोज चावून खा! अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोगी...

१. हायड्रेशन (Hydration) :- योग्य पद्धतीने त्रास न घेता मालत्याग करण्यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे राखणे महत्वाचे असते. पाणी मल मऊ करते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते. पूजा मखीजा यांच्या मते, दिवसभरात कपभर चहा किंवा कॉफीऐवजी दोन कप पाणी प्या. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे राहून बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि मल नरम राहण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे.  सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणं हे पचन सुधारण्यास मदत करतं.

२. मूवमेंट (Movement) :- नियमित चालणे, धावणे, योगासने किंवा डान्स यांसारख्या ॲक्टिव्हिटी केल्याने पचनक्रिया सक्रिय राहते आणि मलविसर्जन सहजरित्या होते. पोषणतज्ज्ञ पूजा मखीजा सांगतात, "फक्त साधं चालणं देखील बद्धकोष्ठतेच्या समस्येवर फायदेशीर ठरु शकतं, पण ते दररोज करणं गरजेचं आहे."

लघवीतले ‘हे’ ४ बदल सांगतात किडनीच्या आजाराची लक्षणं, पाहा तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना...

३. फायबर (Fiber) :- आहारात फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवल्यास मलाच्या प्रमाणात वाढ होते आणि त्यामुळे मलविसर्जन सुलभ होतं, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. पूजा मखीजा सांगतात, आपल्या ताटाचा अर्धा भाग फळं आणि हिरव्या भाज्यांनी भरलेला असावा, जेणेकरून शरीराला भरपूर फायबर मिळेल आणि पचनक्रिया सुरळीत राहील.

रात्री वारंवार लघवीला उठावे लागते, झोपमोड होते ? डॉक्टर सांगतात ४ उपाय, झोप लागेल शांत...

आपण या तीन नियमांच पालन कसे करू शकता ? 

तुम्ही या तीन नियमांचं पालन अगदी सहजपणे करू शकता. दिवसात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. विशेषतः उन्हाळ्यात काकडी, टरबूज,  यांसारखी पाण्याचे प्रमाण भरपूर असणारी फळं आणि भाज्या खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहतं आणि पचनक्रिया सुरळीत होते. यासोबतच दररोज किमान ३० मिनिटं शारीरिक हालचाल किंवा एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. चालणं, धावणं, सायकल चालवणं किंवा योगासनं – यापैकी काहीही केल्याने शरीर सक्रिय राहतं आणि बद्धकोष्ठता कमी होते. शिवाय, आपल्या आहारात फायबरयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करावा. ओट्स, कडधान्य, डाळी, ताज्या भाज्या आणि फळं यामुळे पचन सुधारतं आणि मलविसर्जन सुलभ होतं.

Web Title: 3 Rule For Old Constipation Clear Stomach Better Digestion Constipation Cure Formula 1 Remedy To Relieve Constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.