आपल्याला माहितीच आहे की कोणताही आजार काही एकदम होत नाही. जेव्हापासून आपल्या शरीरात त्या आजाराच्या अनुशंगाने काही बदल व्हायला सुरुवात होते तेव्हापासून आपले शरीर काही ना काही लक्षणं दाखवून आपल्याला त्याबाबत सूचना देत असते. पण आपले त्याकडे दुर्लक्ष होते. किंवा त्याविषयी फारशी माहिती नसल्याने ते बदल आपल्याला ओळखूही येत नाहीत. मधुमेहाचंही तसंच आहे. एकदम आपल्या शरीरातली साखर वाढून आपल्या मागे हा आजार लागत नाही. रक्तातील साखरेची पातळी जेव्हा उच्च पातळी गाठू लागते तेव्हाच आपले शरीर आपल्याला सूचना देते (2 major symptoms of diabetes that seems in pre diabetic stage). महिलांच्या शरीरात तर काही बदल अगदी प्रामुख्याने दिसून येतात. ते बदल कोणते ते पाहा..(type 2 diabetes symptoms in men and women before diagnosis)
डायबिटीसची कोणती लक्षणं काही महिन्यांपुर्वीच शरीरात दिसायला लागतात?
प्री- डायबिटीक स्टेजमध्ये शरीरात कोणते बदल व्हायला सुरुवात झालेली असते याविषयी माहिती सांगणारी पोस्ट डॉ. योगेश आरुल यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
डोळ्यांभोवती, कपाळावर बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? लगेचच 'हे' तेल लावा- त्वचा नेहमीच राहील तरुण
१. स्त्री किंवा पुरुष दोघांच्याही शरीरात दिसून येणारा आणि चटकन ओळखू येणारा बदल म्हणजे मान काही पडणे. शरीराच्या इतर भागाचा रंग आणि मानेचा रंग यांत मोठा फरक दिसून येतो आणि शिवाय त्या काळ्या रंगावर पांढऱ्या रेषाही दिसू लागतात.
२. बऱ्याचदा प्री- डायबिटीक स्टेजमध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या गळ्यावर, मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर मस येण्याचे प्रमाण वाढू लागते.
३. ढेरी सुटणे हे देखील प्री- डायबिटीक स्टेजचे एक लक्षण असल्याचं डॉक्टर सांगतात.
काठपदराची साडी नेसल्यावर खूपच काकुबाई दिसता? ७ लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स- स्टायलिश, सुंदर दिसाल
महिलांच्या शरीरात कोणते बदल दिसून येतात?
१. जांघेच्या भागात, मांड्यांवर, दंडावर तसेच ओटीपोटाच्या भागात अतिरिक्त चरबी साचण्यास सुरुवात होणे.
२. अनेक महिलांना मधुमेह होण्यापुर्वी पीसीओएसचा त्रासही सुरू होतो.