फक्त १० मिनिटांत फ्रिज चकाचक पुसण्याचा १ सोपा उपाय, तेलकट काचा-दरवाज्याचं रबर एकदम स्वच्छ

Updated:May 22, 2025 19:37 IST2025-05-22T11:53:58+5:302025-05-22T19:37:21+5:30

फक्त १० मिनिटांत फ्रिज चकाचक पुसण्याचा १ सोपा उपाय, तेलकट काचा-दरवाज्याचं रबर एकदम स्वच्छ

फ्रिज ही घराघरांमधली अगदी रोजच्या वापरातली वस्तू. भाज्या, दूध, फळं, मसाले, सुकामेवा असं काय काय आपण त्यात ठेवलेलं असतं.

फक्त १० मिनिटांत फ्रिज चकाचक पुसण्याचा १ सोपा उपाय, तेलकट काचा-दरवाज्याचं रबर एकदम स्वच्छ

आपल्या सगळ्या अन्नपदार्थांची काळजी घेणाऱ्या फ्रिजची काळजी घेण्यात आपण मात्र बरेचदा कमी पडतो (how to clean refrigerator?). त्यामुळेच तर कधी फ्रिजमधल्या शेल्फच्या काचा तर कधी फ्रिजचं रबर अगदी कळकट होऊन जातं.(how to remove odour or bad smell from fridge)

फक्त १० मिनिटांत फ्रिज चकाचक पुसण्याचा १ सोपा उपाय, तेलकट काचा-दरवाज्याचं रबर एकदम स्वच्छ

फ्रिजमध्ये आपण अन्नपदार्थ ठेवलेले असतात. त्यामुळे असं मळकट फ्रिज आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकतं. म्हणूनच हा एक सोपा उपाय पाहा आणि फ्रिजची स्वच्छता झटपट करा..

फक्त १० मिनिटांत फ्रिज चकाचक पुसण्याचा १ सोपा उपाय, तेलकट काचा-दरवाज्याचं रबर एकदम स्वच्छ

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये एक ते दिड चमचा बेकिंग सोडा घ्या. बेकिंग सोड्यामुळे फ्रिजचा कळकटपणा कमी होण्यास मदत होते.

फक्त १० मिनिटांत फ्रिज चकाचक पुसण्याचा १ सोपा उपाय, तेलकट काचा-दरवाज्याचं रबर एकदम स्वच्छ

बेकिंग सोड्यामध्ये थोडा लिंबाचा रस आणि थोडं व्हिनेगर टाकून कालवून घ्या. यामुळे फ्रिज आणखी चकाचक होण्यास तर मदत हाेईलच पण फ्रिजमधून येणारी दुर्गंधीही कमी होईल.

फक्त १० मिनिटांत फ्रिज चकाचक पुसण्याचा १ सोपा उपाय, तेलकट काचा-दरवाज्याचं रबर एकदम स्वच्छ

आता हे मिश्रण लावून फ्रिजचा एकेक भाग हलक्या हाताने घासून स्वच्छ करा. त्यानंतर कोमट पाण्यात एखादा सुती कपडा बुडवून अख्खं फ्रिज पुसून घ्या.

फक्त १० मिनिटांत फ्रिज चकाचक पुसण्याचा १ सोपा उपाय, तेलकट काचा-दरवाज्याचं रबर एकदम स्वच्छ

अगदी १० मिनिटांत तुमचं फ्रिज अगदी चकाचक झालेलं जाणवेल.