Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > १२४ वर्षांच्या आजीनं सांगितलं जगण्याचं सिक्रेट; आजारपण न येता दीर्घायुष्य असं मिळेल....

१२४ वर्षांच्या आजीनं सांगितलं जगण्याचं सिक्रेट; आजारपण न येता दीर्घायुष्य असं मिळेल....

124 Year Old Chinese Woman Shares Longevity Secret : १९०१ मध्ये किऊंग साम्राज्यात जन्माला आलेल्या किऊ चैशी या आज १२४ वर्षांच्या आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:28 IST2025-01-22T12:14:00+5:302025-01-22T12:28:32+5:30

124 Year Old Chinese Woman Shares Longevity Secret : १९०१ मध्ये किऊंग साम्राज्यात जन्माला आलेल्या किऊ चैशी या आज १२४ वर्षांच्या आहेत.  

124 Year Old Chinese Woman Shares Longetivity Secreta Her Diet And Daily Routine Lard Rice Walks After Meal | १२४ वर्षांच्या आजीनं सांगितलं जगण्याचं सिक्रेट; आजारपण न येता दीर्घायुष्य असं मिळेल....

१२४ वर्षांच्या आजीनं सांगितलं जगण्याचं सिक्रेट; आजारपण न येता दीर्घायुष्य असं मिळेल....

आपलं आयुष्य मोठं असावं असं प्रत्येकालचा वाटतं. एका चिनी महिलेचं आयुष्य मोठं आणि सुंदरही आहे. प्रत्येकाची इच्छा असते की त्यांनी आपल्या नातंवडांची लग्न पाहावीत. एका चिनी महिलेनं लोकांना तिच्या दीर्घायुष्याचं सिक्रेट सांगितलं आहे. साल १९०१ मध्ये किऊंग साम्राज्यात जन्माला आलेल्या किऊ चैशी या आज १२४ वर्षांच्या आहेत. या वयात सुद्धा त्या एक्टिव्ह आहेत. त्यांचा डाएट प्लॅन कसा आहे ते समजून घेऊ. (124 Year Old Chinese Woman Shares Longevity Secreta Her Diet)

जेव्हा किउ 70 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचा मोठा मुलगा मरण पावला आणि त्यांना मुलाच्या मृत्यूचा खूप मोठा धक्का बसला. किउच्या नातवाच्या पतीच्या आजारपणामुळे मृत्यू झाला आणि त्यानंतर किउ आणि त्यांची नात नानचॉन्गमध्ये एकत्र राहत आहेत. किउ 124 वर्षांच्या आहेत परंतु त्यांचा मेंदू आणि डोळे अजूनही सामान्यपणे कार्य करत आहेत.

१२४ वा बर्थ डे कधी साजरा केला

किऊ चैशी यांनी १ जानेवारी २०२४ ला आपला १२४ वा वाढदिवस साजरा केला. किऊ नानचोंग शहरातील सगळ्यात वृद्ध महिला आहे. नानचोंग चीनच्या सिचुआन प्रांतातील दक्षिण पश्चिम भागात राहतात. किऊ यांनी आपल्या ६ पिढ्यांना पाहिले आहे. त्यांच्या नातीचे वय ६० वर्ष आहे. त्यांच्या कुटूंबातील सगळ्यात तरूण मूल ८ महिन्यांचे आहे. किऊ यांनी अलिकडेच स्थानिक मीडियाला आपल्या दीर्घायुष्याचं सिक्रेट सांगितलं.   कोणतंही एक डाएट फॉलो करून तुम्ही रूटीन सेट करू शकता.

किऊ चैशी यांनी मुलाखतीत सांगितले की साधारण लाईफस्टाईल फॉलो करतात. किऊ चैशी यांनी सांगितले की एका दिवसाला त्या ३ वेळा जेवतात. जेवल्यानंतर रोज बाहेर चालायला जातात. रात्री ८ वाजता झोपायला जातात. इतकंच नाही तर किऊ रोजची कामंसुद्धा  करतात. किऊ यांच्या खाण्यात भोपळा, टरबूज आणि मक्यापासून बनवलेल्या दलियाचा समावेश आहे.

किऊच्या नातवाने सांगितले की तिच्या आजीचे सुरुवातीचे आयुष्य कठीण होते. किआंग साम्राज्यादरम्यान, त्यांनी मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पाहिला. किऊ ृ लोकांना मदत करण्यासाठी गावात खूप प्रसिद्ध आहे. तिच्या उत्कृष्ट शारीरिक आरोग्यामुळे किउ शेतात नांगरणी करण्यात लोकांना मदत करत असे.

शरीर डिटॉक्स करण्याची खास टेक्निक; ५ गोष्टी करा, टॉक्सिन्स बाहेर निघतील, शरीर होईल निरोगी

 पतीचा मृत्यू झाला तेव्हा किउ 40 वर्षांच्या होत्या. पती गेल्यानंतर किऊ यांनी आपल्या चार मुलांचे एकल माता म्हणून संगोपन केले, परंतु किऊ यांनी हिम्मत हारली नाही आणि आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली.

Web Title: 124 Year Old Chinese Woman Shares Longetivity Secreta Her Diet And Daily Routine Lard Rice Walks After Meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.