lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Infertility > World IVF day.. IVF अर्थात टेस्ट ट्यूब बेबीचा निर्णय कुणी-कधी घ्यावा? काय सांगतात डॉक्टर्स..

World IVF day.. IVF अर्थात टेस्ट ट्यूब बेबीचा निर्णय कुणी-कधी घ्यावा? काय सांगतात डॉक्टर्स..

२५ जुलै हा दिवस World IVF day म्हणून साजरा केला जातो. कारण १९७८ साली याच दिवशी इंग्लंडमध्ये जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी जन्माला आली होती. पण इतकी वर्षं उलटून गेल्यानंतरही अजूनही आपल्याकडे IVF संबंधी अनेक गैरसमज दिसून येतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 02:29 PM2021-07-25T14:29:15+5:302021-07-25T17:55:10+5:30

२५ जुलै हा दिवस World IVF day म्हणून साजरा केला जातो. कारण १९७८ साली याच दिवशी इंग्लंडमध्ये जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी जन्माला आली होती. पण इतकी वर्षं उलटून गेल्यानंतरही अजूनही आपल्याकडे IVF संबंधी अनेक गैरसमज दिसून येतात. 

25th July, World IVF day: IVF means test tube baby is beneficial for whom ? | World IVF day.. IVF अर्थात टेस्ट ट्यूब बेबीचा निर्णय कुणी-कधी घ्यावा? काय सांगतात डॉक्टर्स..

World IVF day.. IVF अर्थात टेस्ट ट्यूब बेबीचा निर्णय कुणी-कधी घ्यावा? काय सांगतात डॉक्टर्स..

Highlightsटेस्ट ट्युब बेबी किंवा आयव्हीएफ ही वंधत्व निवारणासाठीची सगळ्यात उत्तम आणि प्रगत उपचार पद्धती आहे.

डॉ. मनीषा काकडे


आई होण्याच्या आनंदापासून वंचित राहिलेल्या अनेक जणींना IVF तंत्रज्ञानाचा फायदा झाला आहे. पण आयव्हीएफबाबत समाजात अजूनही बरेच अज्ञान आहे. अनेक गैरसमज आहेत. टेस्ट ट्युब बेबी किंवा इन विट्रो फर्टिलाइजेशन म्हणजेच आयव्हीएफ ही वंधत्व निवारणासाठीची सगळ्यात उत्तम आणि प्रगत उपचार पद्धती आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे स्त्री बीज व पुरूष बीज शरीराबाहेर एकत्र आणले जातात आणि आयव्हीएफ लॅबमध्ये भ्रुण तयार केले जाते. 

 

कुणासाठी अधिक उपयुक्त ठरते आयव्हीएफ ?


- जसेजसे वय वाढत जाते, तसतसा स्त्री बीजाचा दर्जा खालावत जातो. वयाच्या ३२ वर्षांपर्यंत स्त्री बीजाची गुणवत्ता उत्तम असते असे मानले जाते. त्यामुळे वयाच्या बत्तिशीनंतर अनेक जणींना नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्यात अनेक अडळळे येतात. त्यामुळे खूप प्रयत्न करूनही वयाच्या बत्तिशीनंतर बाळ होत नसेल, तर अशा महिलांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घ्यावी.

२. अनेक महिलांमध्ये फेलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलायजेशन होत असते. पण या ट्यूबमध्ये काही दोष असतील किंवा त्या बंद असतील, तर अशा महिलांसाठीही आयव्हीएफचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.

 

३. ज्या महिलांमध्ये स्त्री बीज तयार होत नाही. किंवा स्त्री बीज तयार होतात, पण ते फुटून बाहेर येत नाही, ज्या महिलांना पीसीओडीचा त्रास असतो, किंवा ज्यांच्या बाबतीत प्री मॅच्युअर ओव्हिरियन फेल्युअर असते, अशा महिलांमध्ये देखील आयव्हीएफ वरदान ठरते.

४. ज्या महिलांच्या गर्भाशयाच्या आतील अस्तरावर, ओव्हरीजवर किंवा फेलोपियन ट्युबमध्ये दोष निर्माण झालेले असतात, अशा महिलांना नैसर्गिकपणे गर्भधारणा होण्यास अनेक अडचणी येतात. त्यांनी जरूर आयव्हीएफचा लाभ घ्यावा. 

५. पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणे, गतिशीलता कमी असणे किंवा गुणवत्ता खालावलेली असणे, हे देखील एक वंधत्वाचे महत्त्वाचे कारण आहे. अशा जोडप्यांसाठीही आयव्हीएफ किंवा इक्सी तंत्रज्ञान फायद्याचे ठरू शकते. 

 

आयव्हीएफ करायचे म्हणजे नेमके काय ?


आयव्हीएफ करताना सगळ्यात आधी एका नीडलद्वारे स्त्रीबीज शरीराबाहेर काढून घेतले जाते. तसेच पुरूषांच्या शुक्राणूचे सॅम्पलही घेतले जातात. त्यानंतर आयव्हीएफ प्रयोगशाळेत स्त्रीबीज आणि शुक्राणू एकत्र आणले जातात आणि गर्भ तयार केला जातो. आईच्या गर्भाशयात असते, तसेच वातावरण प्रयोगशाळेत तयार केले जाते आणि ७२ तास गर्भ वाढविला जातो. यानंतर तिसऱ्या किंवा पाचव्या दिवशी गर्भ गर्भाशयात ठेवण्यात येतो. यानंतर काही दिवसांनी काही तपासण्या केल्या जातात आणि त्यानुसार गर्भधारणा यशस्वी झाली की नाही, हे लक्षात येते. 

(लेखिका डॉ. मनिषा काकडे या इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट असून औरंगाबाद येथील अनंतश्री न्यू स्प्रिंग फर्टिलिटी ॲण्ड आयव्हीएफ सेंटरच्या संचालिका आहेत. )

Web Title: 25th July, World IVF day: IVF means test tube baby is beneficial for whom ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.