lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > Vaginal Cancer Symptoms : व्हजायनल कॅन्सरचा संकेत देतात 5 लक्षणं, वेळीच सावध व्हा; पाहा खबरदारीचे उपाय

Vaginal Cancer Symptoms : व्हजायनल कॅन्सरचा संकेत देतात 5 लक्षणं, वेळीच सावध व्हा; पाहा खबरदारीचे उपाय

Vaginal Cancer Symptoms : महिलांमध्ये  ५ लक्षणं असू शकता व्हजायनल कॅन्सरचे संकेत; कारणं, खबरदारीचे उपाय.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 05:15 PM2022-01-11T17:15:10+5:302022-01-11T17:17:43+5:30

Vaginal Cancer Symptoms : महिलांमध्ये  ५ लक्षणं असू शकता व्हजायनल कॅन्सरचे संकेत; कारणं, खबरदारीचे उपाय.. 

Vaginal Cancer Symptoms : Common vaginal cancer symptoms that women should not ignore | Vaginal Cancer Symptoms : व्हजायनल कॅन्सरचा संकेत देतात 5 लक्षणं, वेळीच सावध व्हा; पाहा खबरदारीचे उपाय

Vaginal Cancer Symptoms : व्हजायनल कॅन्सरचा संकेत देतात 5 लक्षणं, वेळीच सावध व्हा; पाहा खबरदारीचे उपाय

शरीराच्या कोणत्याही भागाच्या पेशी अचानक वाढू लागतात, तेव्हा जीवघेणा कॅन्सरचा आजार वाढतो. हे प्रामुख्याने बिनाइन  कॅन्सर आणि मॅलिग्नेंट  कॅन्सर अशा दोन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक म्हणजे योनीमार्गाचा कॅन्सर म्हणजेच व्हजायनल कॅन्सर. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ रेखा गुप्ता यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार योनीमार्गाचा कॅन्सर हा दुर्मिळ असला तरी त्यावर वेळीच उपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो.

व्हजायनल कॅन्सर (Vaginal Cancer) सामान्यतः तुमच्या गर्भाशयाला इतर जननेंद्रियांशी (बाह्य अवयवांना) जोडणाऱ्या स्नायूंच्या नळीमध्ये दिसून येतो. हा आजार बर्थ कॅनल पेशींमध्येही होऊ शकतो. योनीमार्गात कॅन्सरच्या पेशींची वाढ झाल्यास काही लक्षणं  जाणवतात. त्याकडे दुर्लक्ष करणं आधी थांबायलाहवं. 

असामान्य व्हजायनल डिस्चार्ज

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रथम योनीतून स्त्राव किंवा रक्तस्त्राव या स्वरूपात दिसून येतो. हा रक्तस्त्राव मासिक पाळीच्या रक्तस्रावापेक्षा वेगळा  असतो आणि या काळात तुम्हाला लाल स्त्राव देखील दिसू शकतो. जे कोणत्याही प्रकारे सामान्य नाही. म्हणून, या परिस्थितीत आपण डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.

कितीही स्वच्छ घासले तरी दात पिवळे दिसतात? पांढऱ्या दातांसाठी 'या' टिप्स वापरा कायमचा दूर होईल पिवळेपणा

गाठ येणं

या कॅन्सरचे आणखी एक चिंताजनक लक्षण म्हणजे योनीमार्गात गाठ तयार  होणे. स्तनाचा कॅन्सर असो किंवा योनीमार्गाचा कॅन्सर असो, गाठ होणे हे थोडेसे असामान्य आहे. जेव्हा कर्करोग होतो, तेव्हा तुमच्या त्वचेतील पेशी असामान्य वाढतात. त्यामुळे या प्रकारची लक्षणे दिसल्यानंतर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

लघवी करताना वेदना 

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग नसेल आणि तुम्ही स्वच्छता राखता असाल यानंतरही लघवी करताना वेदना होत असतील तर ते योनीमार्गाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. हे लक्षण दिसल्यानंतर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जायला हवं.

प्लिज आज नको! -सेक्समध्ये काही रसच उरला नाही, फार थकल्यासारखं वाटतं? असं का होतं, तज्ज्ञ सांगतात...

सेक्शुअल इंटरकोर्सदरम्यान वेदना जाणवणं

लैंगिक संभोग करताना नेहमीच तीव्र वेदना होत असल्यास  हे योनीमार्गाच्या कॅन्सरचे लक्षणही असू शकते. हे एक सामान्य लक्षण नाही, म्हणून तुम्ही एकदा तुमच्या स्त्रीरोगाशी देखील चर्चा केली पाहिजे.

योनीच्या रंगात बदल

योनीचा रंग आधीच्या तुलनेत बदलला तर ते योनीमार्गाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला योनीच्या रंगात बदल आणि इतर काही लक्षणे जसे की दुर्गंधी, सूज इ. अशी लक्षणं  दिसली तर तुमची समस्या वाढू शकते. म्हणून, आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा ते घातक ठरू शकते. 

Web Title: Vaginal Cancer Symptoms : Common vaginal cancer symptoms that women should not ignore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.