lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > प्लिज आज नको! -सेक्समध्ये काही रसच उरला नाही, फार थकल्यासारखं वाटतं? असं का होतं, तज्ज्ञ सांगतात...

प्लिज आज नको! -सेक्समध्ये काही रसच उरला नाही, फार थकल्यासारखं वाटतं? असं का होतं, तज्ज्ञ सांगतात...

How to improve sex life : लैंगिक जीवनातल्या अडचणींविषयी सहसा मोकळेपणानं जोडीदाराशीही अनेकजण बोलत नाहीत. महिला तर नाहीच नाही. जॉबचं टेंशन, अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या, स्ट्रेस, मुलांचा सांभाळ, आर्थिक ताण अशी अनेक कारणं असतात. 

By manali.bagul | Published: January 10, 2022 05:36 PM2022-01-10T17:36:39+5:302022-01-10T17:58:40+5:30

How to improve sex life : लैंगिक जीवनातल्या अडचणींविषयी सहसा मोकळेपणानं जोडीदाराशीही अनेकजण बोलत नाहीत. महिला तर नाहीच नाही. जॉबचं टेंशन, अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या, स्ट्रेस, मुलांचा सांभाळ, आर्थिक ताण अशी अनेक कारणं असतात. 

How to improve sex life : Too tired for sex 5 tips to improve your sex life or ways to help yourself to a better sex life | प्लिज आज नको! -सेक्समध्ये काही रसच उरला नाही, फार थकल्यासारखं वाटतं? असं का होतं, तज्ज्ञ सांगतात...

प्लिज आज नको! -सेक्समध्ये काही रसच उरला नाही, फार थकल्यासारखं वाटतं? असं का होतं, तज्ज्ञ सांगतात...

मनाली बागुल

...प्लिज आज नको, आज माझा मूड नाहीये, आज जरा थकल्यासारखं वाटतंय. संभोगासाठी नकार देताना पार्टनरकडून अनेकदा अशी उत्तरं देतात. सुखी वैवाहिक जीवनासाठी जोडप्यांमधलं लैंगिक वर्तन अनुकूल असणं फार महत्वाचं असतं. (Sexual health)  सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक तरूण स्त्री, पुरूषांचा लैगिंक जीवनातील रस कमी झाल्याची तक्रार दिसते. लैंगिक जीवनातल्या अडचणींविषयी सहसा मोकळेपणानं जोडीदाराशीही अनेकजण बोलत नाहीत. महिला तर नाहीच नाही. जॉबचं टेंशन, अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या, स्ट्रेस, मुलांचा सांभाळ, आर्थिक ताण अशी अनेक कारणं असतात. (How To improve Sex life)

परस्परांशी असलेला मनमुटाव, खटकणाऱ्या गोष्टी, अपेक्षांची ओझी आणि काही अनामिक भीती यामुळेही शरीरसंबंधात रस नसणं, उरकून टाकणं किंवा जवळीक टाळणं आणि एकमेकांकडे पाठ करुन झोपणं असं घडतं. यासाऱ्याची कारणं शोधली पाहिजेत कारण त्याचा केवळ लैंगिक जीवनाशीच नाही तर कौटुंबिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्याशीही जवळचा संबंध असतो. लैगिंक जीवन निकोप असणं, त्यात आनंद मिळणं यासाठी काही गोष्टींचा गांभिर्याने विचार करुन वेळीच तक्रारींवर उत्तरं शोधली पाहिजते. लैंगिक विकारतज्ज्ञ डॉ. राजन भोसले या सर्वसाधारण समस्येंविषयी अधिक माहिती देतात..

शरीरसंबंधातील रस कमी होण्याची कारणं काय? (Why we lose interest in sex)

डॉ. भोसले सांगतात, ''दिवसभर ज्यावेळी तुम्ही १० ते १२ तास स्ट्रेसफूल काम करत असता, ट्रेन, बसचा प्रवास असो किंवा कारचा प्रवास असो दिवसाच्या शेवटी थकवा येणं स्वाभाविक आहे. अशावेळी रात्रीच्या जेवणानंतर शरीराला विश्रांतीची गरज असते. याउलट शरीर संबंध ठेवायला खूप उर्जेची, ताकदेची गरज असते. दिवसभराचा थकवा असताना रात्री शरीरसंबंध ठेवण्यात सगळ्यांनाच उत्साह असतो असं नाही. रात्रीच्या वेळीच संभोग व्हायला हवा असा गैरसमज अनेक जोडप्यांमध्ये असतो.

त्यापेक्षा रात्री छान झोप घेऊन तुम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे फ्रेश मूडमध्ये असताना संभोग केल्यास उत्तम ठरेल किंवा सुट्टीच्या दिवशी, विकेंडला प्लॅन करून तुम्ही पार्टनरसह चांगला वेळ घालवू शकता. पण जर रात्रीची झोप व्यवस्थित झाल्यानंतरही सकाळी थकवा येत असेल. दुपारी जास्त झोप येणं, कामादरम्यान थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं चेकअप करून घ्यायला हवं. याशिवाय लैंगिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही ज्या घरात, संस्कृतीत वाढलात त्याच प्रकारचा सवयीचा आहार व्यवस्थित घेत राहायला हवा.''

शरीरसंबंधासाठी योग्य वेळ कोणती? (What's the best time of day for sex?)

''ज्यावेळी दोघांनाही रिलॅक्स वाटत असेल. सेक्सचा मूड असेल किंवा दोघांनाही एकमेंकाबद्दल आकर्षण वाटत असेल तर अशावेळी जोडप्यांमध्ये वेळेचं बंधन आडवं येत नाही. त्यांना जेव्हा सोयीस्कर वाटेल तेव्हा ते शरीरसंबंध ठेवू शकतात. रात्री किंवा सकाळच्या वेळेतच शरीर संबंध ठेवायला हवेत असं काहीही नाही. सकाळची वेळ शरीर संबंध ठेवण्यासाठी सगळ्यात उत्तम ठरते.

कारण लैगिंक उत्तेजना देणारा टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन पहाटेच्यावेळी स्त्रीयांमध्येही आणि पुरूषांमध्येही चांगला प्रतिसाद देतो. याशिवाय रात्री भरपूर विश्रांती घेतल्यानं पहाटेच्यावेळी फ्रेश वाटतं. पहाटेच्यावेळी मिळणारी उत्तेजनाही वेगळीच असते. त्यामुळे दोघांमध्ये समान अंडरस्टँडिंग असेल तर ठरवून पहाटेच्यावेळी शरीरसंबंध ठेवले तर जास्त आनंद घेता येऊ शकतो.'' असं डॉ. भोसले सांगतात.

लैंगिक सुखातील रस वाढवण्यासाठी काय करता येईल? (Tips For Happy Sex Life)

१. एकमेकांशी बोला

संशोधनात असे दिसून आले आहे, की जी जोडपी  सेक्सबद्दल एकमेकांशी मोकळेपणानं बोलतात ते चांगले सेक्स पार्टनर असतात. बेडवर असताना तुम्हाला काय आवडतं काय नाही. पार्टनरच्या कोणत्या कृती जास्त प्रभावी वाटतात. याबाबत मनमोकळेपणानं बोलायला हवं. यामुळे एकूणच नातं सुधारण्यास मदत होते.

२. सेक्स हवा, रोमान्सचं काय?

ग्रेट सेक्स हा नेहमी लहान स्पर्शाने सुरू होते. दिवसभरातून कधीही पार्टनरचा हात हातात घेणं, चुंबन घेणे किंवा मिठी मारणे या कृती केल्यानं कधीही तुमचा मूड होऊ शकतो. असं वर्तन तुमचं नातं मजबूत करेल आणि विश्वास आणि प्रेमाचे वातावरण निर्माण करेल. आपल्याकडे लक्ष आहे अशी भावना जोडीदाराला वाटेल.

३. फिटनेसचं काय?

व्यायामामुळे तुमचा मूड चांगला ठेवणारे एंडोर्फिन हॉर्मोन तयार होते. इतर अनेक आरोग्य फायद्यांसोबतच, व्यायामामुळे तुमचा सेक्स ड्राइव्ह देखील वाढू शकतो. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण वाढल्याने तुमचा मूड आणि लैंगिक इच्छा सुधारते. आपली शरीरयष्टी कशी आहे याचाही जोडीदाराचा आपल्याकडे आकर्षित होण्याचा संबंध असतोच.

Web Title: How to improve sex life : Too tired for sex 5 tips to improve your sex life or ways to help yourself to a better sex life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.