lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > Uterine Cancer Symptoms : गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; वेळीच त्रासदायक आजार टाळा

Uterine Cancer Symptoms : गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; वेळीच त्रासदायक आजार टाळा

Uterine Cancer Symptoms : नुकत्याच समोर आलेल्या रिसर्चनुसार ज्या महिलांचे वजन खूप जास्त असते त्यांच्यात कॅन्सरचा वाढण्याचा धोका खूप जास्त असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 02:00 PM2022-04-21T14:00:13+5:302022-04-21T14:02:09+5:30

Uterine Cancer Symptoms : नुकत्याच समोर आलेल्या रिसर्चनुसार ज्या महिलांचे वजन खूप जास्त असते त्यांच्यात कॅन्सरचा वाढण्याचा धोका खूप जास्त असतो.

Uterine Cancer Symptoms : Overweight woman double risk womb cancer causes and symptoms | Uterine Cancer Symptoms : गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; वेळीच त्रासदायक आजार टाळा

Uterine Cancer Symptoms : गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; वेळीच त्रासदायक आजार टाळा

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अनियमित जीवनशैलीमुळे वजन वाढण्याची समस्या अनेकांमध्ये उद्भवताना  दिसते. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.  एकदा वजन वाढलं की इतर आजारांचा धोकाही वाढतो. (How does obesity cause cancer) नुकत्याच समोर आलेल्या रिसर्चनुसार ज्या महिलांचे वजन खूप जास्त असते त्यांच्यात कॅन्सरचा वाढण्याचा धोका खूप जास्त असतो.

यासाठी ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी युकेसहित ७ विकसित देशांच्या १ लाख वीस हजार लोकांच्या माहितीचे विश्लेषण केले. दरम्यान बॉडी मास इंडेक्स १८ ते २५ असल्यास ही निरोगी रेंज मानली जाते.  २५ ते ३० बॉडी मास इंडेक्सला अधिक वजन मानले जाते. ज्यांचे बॉडी मास इंडेक्स ३० पेक्षा जास्त असते ते लोक लठ्ठपणानं ग्रस्त असतात. (Overweight woman double risk womb cancer causes and symptoms)

रिसर्च 

तज्ज्ञांच्यमते ज्या महिलांमध्ये बीएमआय ५ प्वाईंट अधिक असतो त्यांच्यात गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका ८८ टक्के जास्त असतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जास्त वजन इंसुलिन आणि टेस्टॉस्टेरॉन लेव्हलवर वाईट परिणाम करतो. यामुळे आजारांचा धोका वाढतो. गर्भाशयाच्या कॅन्सरला एंडोमेट्रियल कॅन्सरसुद्धा म्हणतात. जेव्हा गर्भाशयात असामन्य पेशींची वाढ होते तेव्हा गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका जास्त वाढतो.

 नसांना चिकटलेले घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ फळं; रोज खा, गंभीर आजारांपासून लांब राहाल

दरवर्षी १० हजार महिला या  कॅन्सरच्या जाळ्यात अडकतात. या आजाराचा थेट संबंध लठ्ठपणाशी आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसर ३६ पैकी एका महिलेला आपल्या जीवनकाळात या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागतो. यामुळेच हा महिलांमध्ये उद्भवणारा सामान्य कॅन्सर प्रकार बनला आहे. 

अंथरूणात पडल्या पडल्या ढाराढूर झोपाल; फक्त रात्री झोपताना वापरा सोप्या ट्रिक्स

कॅन्सर रिसर्च युकेमध्ये हेल्थ इंफॉर्मेशन हेड डॉ. जूली शार्प यांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून लठ्ठपणा आणि कॅन्सरमधल्या संबंधांचा अभ्यास सुरू आहे. जास्त वजनामुळे १४ वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो. कॅन्सरचा आजार उद्भवू नये म्हणून हेल्दी वेट मेंटेन करणं गरजेचं आहे याशिवाय बॅलेंन्स डाएटही घ्यायला हवं.

गर्भाशयाच्या कॅन्सरचे लक्षण (Symptoms of womb cancer)

मेनोपॉजनंतरही व्हजायनल ब्लिडींग, स्पॉटिंग

मासिक पाळीत हेवी ब्लिडींग

व्हजायनल डिस्चार्जमध्ये बदल

पोट किंवा हिप्स बोन्सच्या आजूबाजूला सूज येणं

संभोगादरम्यान वेदना

युरिन पास करताना वेदना जाणवणं 

अचानक वजन कमी होणं

गर्भाशयाच्या कॅन्सरचे कारण (Causes of womb cancer)

लठ्ठपणा

हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम

डायबिटीस

कौटुंबिक इतिहास

Web Title: Uterine Cancer Symptoms : Overweight woman double risk womb cancer causes and symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.