lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > स्तनाग्रांना भेगा पडल्या, वेदना होतात, चिकट द्रव निघतो? गंभीर आजाराची लक्षणं, अशावेळी काय कराल...

स्तनाग्रांना भेगा पडल्या, वेदना होतात, चिकट द्रव निघतो? गंभीर आजाराची लक्षणं, अशावेळी काय कराल...

Nipple Skin Diseases : स्तनाग्रांच्या अनेक समस्या भारतीय महिलांमध्ये आढळतात, त्यावर वेळीच औषधोपचार करणं गरजेचं असतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 03:43 PM2023-03-02T15:43:34+5:302023-03-02T15:51:10+5:30

Nipple Skin Diseases : स्तनाग्रांच्या अनेक समस्या भारतीय महिलांमध्ये आढळतात, त्यावर वेळीच औषधोपचार करणं गरजेचं असतं.

Nipple Skin Diseases : Skin diseases of the breast and nipple solution and symptoms by experts advice | स्तनाग्रांना भेगा पडल्या, वेदना होतात, चिकट द्रव निघतो? गंभीर आजाराची लक्षणं, अशावेळी काय कराल...

स्तनाग्रांना भेगा पडल्या, वेदना होतात, चिकट द्रव निघतो? गंभीर आजाराची लक्षणं, अशावेळी काय कराल...

डॉ. नेहा अभिजित पवार

भारतीय महिलांना त्रासदायक ठरणाऱ्या अनेक आरोग्य समस्यांपैकी एक म्हणजे स्तनाग्रांच्या समस्या. स्तनाग्रांना सूज येणे, त्यामधून द्रव बाहेर येणे, स्तनाग्रे उलटी असणे या काही समस्या साधारण आढळून येतात. काही समस्या त्रासदायक असतात पण काहींमुळे विशेष त्रास होत नाही. (Nipple skin diseases) मात्र ज्यामुळे त्रास होऊ शकतो, वेदना होतात त्या लक्षणांकडे मात्र लक्ष ठेवायला हवे. १. स्तनाग्रांमधून द्रव बाहेर येणे, हा द्रव पारदर्शक, दुधाळ, हिरवा, पिवळा किंवा तपकिरी रंगाचा असू शकतो. २. स्तनाग्रांना खाज येणे किंवा त्याठिकाणी अस्वस्थ वाटणे. ३. स्तनाग्रांना भेगा पडणे किंवा त्यातून रक्त येणे. ४. स्तनाग्रांमध्ये सूज आणि वेदना. (Skin diseases of the breast and nipple solution and symptoms by experts advice)

हा त्रास कशाने होतो?

१. दुधाच्या नलिका ब्लॉक झालेल्या असणे - दुधाच्या नलिकांमध्ये काहीतरी अडकले असल्यास, त्या ब्लॉक होतात. त्यामुळे नलिकांमध्ये दूध जमा होऊन राहते. या स्थितीला एक्टशिया म्हणतात. अशा नलिकांमध्ये विषाणू निर्माण होण्यास पुरेपूर वाव असतो, त्यामुळे संसर्ग होऊन, पू होतो. दुधाच्या नलिका ब्लॉक झालेल्या असण्याची समस्या स्तनपान करवणाऱ्या मातांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येत असली तरी इतर महिलांना देखील हा त्रास होऊ शकतो.

२. गॅलेक्टोरिया - एका किंवा दोन्ही स्तनाग्रांमधून दुधाळ द्रव बाहेर येत असल्याच्या स्थितीला गॅलेक्टोरिया म्हणतात. स्तनपानाशी याचा काहीही संबंध नसतो. प्रोलॅक्टिन हार्मोन स्तरामध्ये वाढ झाल्याने ही स्थिती निर्माण होते. प्रोलॅक्टिन हार्मोन वाढण्यामागे झोप नीट न होणे, अँटिडिप्रेसंट किंवा अँटासिड औषधे घेणे किंवा काही पिट्युटरी ग्रंथीमध्ये ट्युमर झालेला असणे अशी अनेक कारणे असू शकतात. औषधे घेऊन प्रोलॅक्टिन स्तरांवर नियंत्रण ठेऊन आणि स्तनाग्रे सतत उत्तेजित होण्याचे टाळल्याने गॅलेक्टोरियावर उपचार करता येतात.

रात्री पडल्याबरोबर शांत झोपाल; फक्त उशाखाली न चुकता १ गोष्ट ठेवा, दिवसभर राहाल फ्रेश

३. स्तनपान करवणाऱ्या मातांमध्ये स्तनाग्रांना भेगा पडणे, वेदना होणे - बाळाला स्तनपान योग्य प्रकारे न करवल्यास स्तनाग्रांना भेगा पडू शकतात, त्यांना सूज येऊ शकते, त्यामुळे वेदना होतात, संसर्ग किंवा गळू होण्याची देखील शक्यता असते. स्तनपान करत असताना बाळाला योग्य प्रकारे पकडणे आणि स्तनपान योग्य पद्धतीने करणे खूप आवश्यक असते. 

उन्हाळ्यात पांढऱ्या पाण्याचा त्रास होतोय, खाज येते? त्रासदायक इन्फेक्शन टाळायचं तर.....

४. स्तनांना होणारा पॅजेट्स आजार - स्तनाग्रांना पॅजेट्स आजार होणे खूप दुर्मिळ आहे, याचा संबंध स्तनांच्या कर्करोगाशी असतो. प्रामुख्याने याचा परिणाम स्तनाग्रे व त्याभोवतीच्या त्वचेवर होतो, त्यामुळे त्वचेमध्ये बदल होऊन ती एक्झिमा झाल्यासारखी दिसते. यामुळे स्तनाग्रांभोवतीच्या त्वचेला खाज येणे, ती लाल होणे, खपल्या निघणे, त्वचा खडबडीत होणे असे त्रास होऊ शकतात. यामुळे स्तनाग्रांमधून पिवळ्या किंवा रक्तासारखा द्रव देखील येऊ शकतो. पॅजेट्स आजार हे स्तनाग्रांच्या मागे स्तनांचा कर्करोग झाल्याचे लक्षण असते आणि या आजाराचे निदान झालेल्या जवळपास ५०% महिलांमध्ये स्तनाग्रांच्या मागे गाठ असते. १० पैकी ९ केसेसमध्ये हा अतिशय धोकादायक असा स्तनांचा कर्करोग असतो. स्तनांच्या कर्करोगामध्ये पॅजेट्स आजारावर उपचार करणे आवश्यक असते. ही स्थिती का निर्माण होते याचे नेमके कारण माहिती नाही.

काय करता येईल?

भारतीय स्त्रियांमध्ये स्तनाग्रांच्या समस्या असणे ही खूपच सर्वसामान्य बाब झाली आहे. समस्या लवकरात लवकर लक्षात येणे आणि त्यावर उपचार केले जाणे खूप गरजेचे आहे. दूध नलिका ब्लॉक होण्यापासून ते पॅजेट्स आजारापर्यंत सर्वच समस्यांमध्ये बराच त्रास होतो आणि पुढे गुंतागुंत होण्याची देखील शक्यता असते. बऱ्याचदा स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने आजाराचे निदान व त्यावर उपचार वेळेवर होऊ शकत नाहीत. डॉक्टरांचा सल्ला घेऊन, तपासण्या करून व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून स्तनाग्रांच्या आजारांवर उपचार करण्यात व त्यांना आळा घालण्यात मदत मिळू शकते.

(कन्सल्टन्ट, गायनॅकॉलॉजी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई)

Web Title: Nipple Skin Diseases : Skin diseases of the breast and nipple solution and symptoms by experts advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.