बऱ्याच स्त्रियांना अंगावरून पांढरं पाणी जाण्याचा त्रास होतो. थोडाफार डिस्चार्ज होत असेल तर ते नॉर्मल मानलं जातं आणि त्यामध्ये घाबरण्यासारखं काही नसतं. पाळी येण्याच्या आधी, ओव्ह्युलेशनच्या दरम्यान किंवा संबंधादरम्यान हा त्रास होत असेल तर ते सामान्य आहे आणि त्यासाठी कोणतीही ट्रिटमेंट घेण्याची गरज नाही. पण एरवीही हा त्रास जास्त प्रमाणात होत असेल तर त्यावर मात्र काही उपाय करणं गरजेचं असतं. कारण यामुळे पाठ, कंबर दुखणं, गळून जाणं, अशक्तपणा येणं हा त्रास वाढतो (ayurvedic home remedies to get relief from white discharge). म्हणूनच आयुर्वेदिक डाॅक्टरांनी सांगितलेला तण्डुलोदक (what is Tandulodak?) किंवा तांदळाचं धुवण हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (benefits of Tandulodak) आणि जर फरक पडला नाही तर मात्र तुमच्या नेहमीच्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला लवकरात लवकर घ्या..(how to get rid of leucorrhea or white discharge?)
व्हाईट डिस्चार्जचा त्रास कमी करण्यासाठी तण्डुलोदक उपाय
अंगावरून पांढरं पाणी जात असेल तर त्यासाठी तांदळाचं धुवण किंवा तण्डुलोदक हा आयुर्वेदिक उपाय घरच्याघरी कसा करावा याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आयुर्वेदिक डॉक्टरांनी dr.nehakarandikarjoshi या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
बिनसाखरेचा चहा-कॉफी पिऊनही वजन घटत नाही कारण ‘ही’ बेचव चूक करते घात, हलतच नाही वजनाचा काटा
हा उपाय करण्यासाठी रात्र झोपण्यापुर्वी साधारण १ वाटी तांदूळ घ्या. २ ते ३ पाण्याने हाताने चोळून तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर जेवढे तांदूळ असतील त्याच्या आठपट पाणी घालून हे तांदूळ रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी प्या. त्रास लवकरच कमी होईल.
सध्या तांदळाच्या पाण्याचा कोरियन ब्यूटी ट्रेण्ड सध्या खूप गाजतो आहे. आपल्याकडे मात्र खूप पुर्वीपासून तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणणारे तज्ज्ञ होते.
हिवाळ्यात प्रत्येकाने खायलाच हवे ३ सुपरफूड- त्वचा, केस चांगले होऊन तब्येतीला होतील भरमसाठ फायदे
केवळ केस आणि त्वचा यांचं सौंदर्य खुलविण्यासाठीच तांदळाचं पाणी उपयुक्त ठरतं असं नाही, तर कित्येक महिलांना होणारा व्हाईट डिस्चार्जचा त्रास कमी करण्यासाठीही तांदळाचं पाणी अतिशय फायदेशीर आहे, हेच यातून दिसून येतं. हा उपाय नियमितपणे केल्यास व्हाईट डिस्चार्जचा त्रास तर कमी होतोच, पण शरीरातली उष्णता कमी करणे, पचनक्रिया चांगली होण्यासाठीही त्याचा फायदा होतो.
