शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणे, ज्याला वैद्यकीय भाषेत 'ॲनिमिया' (Anemia) म्हणतात, हे थकवा आणि अशक्तपणाचे मुख्य कारण असते. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोहयुक्त (Iron-rich) पदार्थांचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढवण्यासाठी लोह, व्हिटामीन बी-१२ आणि फॉलिक एसिडयुक्त पदार्थांचे सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. (How To Increase Hemoglobin In Your Body)
रक्त वाढवण्यासाठी काय खावे? (Foods For Hemoglobin)
पालक आणि मेथीमध्ये भरपूर लोह असते जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. डाळिंब, सफरचंद आणि बीट रक्तातील लाल पेशी वाढवण्यास मदत करतात. खजूर, मनुका आणि बदाम नियमित खाल्ल्यानं शरीराला नैसर्गिकरित्या लोह मिळते. मटकी, चणे, मोड आलेली कडधान्य लोहाचा उत्तम स्त्रोत आहेत.
गुळामध्ये लोह असते. जे शेंगदाण्यांसोबत खाल्ल्यास शरीरात लवकर शोषले जाते. संत्री किंवा लिंबू यांसारखी फलं खाणं गरजेचं आहे. कारण व्हिटामीन सी मुळे शरीर लोह चांगल्या प्रकारे शोषून घेते. वाळवलेले अंजीर आणि जर्दाळूमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. जे हिमोग्लोबीन झपाट्यानं वाढवण्यास मदत करते.
शरीरात लोहाची कमतरता भासू नये यासाठी काय करावे?
केवळ लोहयुक्त पदार्थ खाऊन चालत नाही, तर ते शरीरात शोषले जाणेही महत्त्वाचे आहे. यासाठी व्हिटॅमिन C युक्त पदार्थांची मदत होते. लिंबू, संत्री किंवा आवळा यांसारख्या फळांमुळे अन्नातील लोह रक्तप्रवाहात मिसळण्यास मदत होते. याउलट, जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे टाळावे, कारण त्यातील घटक लोहाच्या शोषणात अडथळा निर्माण करतात.
कडधान्य जसे की चणे, मोड आलेली मटकी आणि गूळ-चणे यांचा समावेश केल्यास रक्ताची कमतरता लवकर भरून निघते. गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासोबतच पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते. जर रक्ताचे प्रमाण खूपच कमी असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने लोहाच्या गोळ्या घेणे आवश्यक ठरू शकते. लोहाच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास तब्येतीत सुधारणा होऊन रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होईल.
Web Summary : Combat fatigue from low blood! Iron-rich foods like spinach, dates, and jaggery increase hemoglobin. Vitamin C aids iron absorption. Prioritize sleep and exercise for better blood circulation.
Web Summary : कम रक्त से होने वाली थकान से लड़ें! पालक, खजूर और गुड़ जैसे आयरन युक्त खाद्य पदार्थ हीमोग्लोबिन बढ़ाते हैं। विटामिन सी आयरन के अवशोषण में मदद करता है। बेहतर रक्त परिसंचरण के लिए नींद और व्यायाम को प्राथमिकता दें।