Lokmat Sakhi >Health >Anemia > सतत थकवा येतो-हिमोग्लोबिन कमी झालंय? रोज ७ पदार्थ खा, रक्त वाढेल-अशक्तपणा येणारच नाही

सतत थकवा येतो-हिमोग्लोबिन कमी झालंय? रोज ७ पदार्थ खा, रक्त वाढेल-अशक्तपणा येणारच नाही

Foods For Hemoglobin Growth (rakt vadhvnyasathi kay khave) : शरीरात आयर्नची कमतरता भासल्यास थकवा येणं, कमकुवतपणा, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:15 AM2023-11-27T10:15:43+5:302023-11-27T11:18:17+5:30

Foods For Hemoglobin Growth (rakt vadhvnyasathi kay khave) : शरीरात आयर्नची कमतरता भासल्यास थकवा येणं, कमकुवतपणा, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात.

Foods For Hemoglobin Growth : Winter Special What Food Can Help Increase Hemoglobin | सतत थकवा येतो-हिमोग्लोबिन कमी झालंय? रोज ७ पदार्थ खा, रक्त वाढेल-अशक्तपणा येणारच नाही

सतत थकवा येतो-हिमोग्लोबिन कमी झालंय? रोज ७ पदार्थ खा, रक्त वाढेल-अशक्तपणा येणारच नाही

आपल्या शरीराला पोषक तत्वांची आवश्यकता असते. (Winter Health Tips) यात आयर्नचाही समावेश आहे. आयर्न चांगल्या आरोग्याासठी उत्तम मानले जाते. शरीरात हिमोग्लोबीन वाढवण्यासही मदत होते. (Rakt vadhvnyache upay) ज्यामुळे शरीराला ऑक्सिजन पुरवण्यास मदत होते.(How to boost iron deficiency) शरीरात आयर्नची कमतरता भासल्यास थकवा येणं, कमकुवतपणा, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात आयर्नयुक्त  पदार्थांचा समावेश असायला हवा. डॉ. निकीता कोहोली यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Winter Special What Food Can Help Increase Hemoglobin) काही रेसिपीज शेअर केल्या आहेत. (Rakt vadhvnyache padarth)

पालक डाळ

पालक आयर्नचा सगळ्यात उत्तम स्त्रोत आहे. याच्या सेवनाने शरीरात हिमोग्लोबिची कमतरता जाणवत नाही. आयर्नची कमतरता पूर्ण  करण्यासाठी तुम्ही पालक डाळीचे सेवन करू शकता. पालकाच्या भाजीत तूर,  मूगाची डाळ मिसळून ही डाळ बनवू शकता. 

गाजर आणि बिटरूट सॅलेड

गाजर  आणि बीटरूट सॅलेड  छोट्या भुकेसाठी  उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये किसलेलं गाजर आणि बीटरूट घ्या. यात भाजलेलं जीरं, लिंबाचा रस, मीठ आणि  कोथिंबीर मिसळून सॅलेड तयार करा.

नाचणीची खिचडी

थंडीच्या दिवसांत आहारात कॅल्शियमयुक्त आणि अन्य पोषक तत्वाची आवश्यकता असते. यासाठी तुम्ही नाचणीची खिचडी खाऊ शकता.  यात तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. 

काळ्या तिळाचे लाडू

हे लाडू खाल्ल्याने इम्यूनिटी बूस्ट होते आणि शरीरात तापमान नियंत्रणात राहते. याच्या सेवनाने शरीरात रक्ताची कमतरता उद्भवत नाही.  तीळ भाजून त्यात गूळ मिसळून  मिक्सरमध्ये वाटून घ्या यात खजूर घाला. यात तुम्ही ड्रायफ्रुट्सही घालू शकता. या मिश्रणाचे लाडू वळून घ्या. 

शाहरूखनं सांगितलं बाऊंसी-दाट केसांचं सिक्रेट; काळ्या केसांसाठी वापरतो किचनमधले हे ३ पदार्थ

डाळिंब आणि खजूराची चटणी

जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्ही डाळिंब आणि खूजराची चटणी बनवू शकता.  यात आयर्नचे प्रमाण अधिक असते. याशिवाय पचनाच्या दृष्टीनेही अनेक फायदे मिळतात. ही चटणी बनवण्यासाठी डाळिंब आणि खजूर एकत्र वाटून त्यात जीरं, लाल मिरची, मीठ मिसळा. ही चटणी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. 

पालेभाज्या

 मेथी, पालक, शेपू या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. पालेभाज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढू शकता. 

मुलं अशक्त दिसतात-नीट जेवतही नाही? रोज हा १ लाडू खायला द्या, वजन वाढेल-हूशार होतील मुलं

ड्रायफ्रुट्स

हिवाळ्याच्या दिवसांत अनेक घरांमध्ये ड्रायफ्रुट्सचे लाडू खाल्ले जातात. ड्रायफ्रुट्सचे  लाडू खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात.  यातून आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन्सही मिळतात.  ज्या्मुळे बराचवेळ एनर्जी टिकून राहते. 

Web Title: Foods For Hemoglobin Growth : Winter Special What Food Can Help Increase Hemoglobin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.