Lokmat Sakhi >Health >Anemia > टॉनिकपेक्षा प्रभावी आहेत २० रूपयांच्या आत मिळणारे ६ पदार्थ; अशक्तपणा, रक्ताची कमतरता होईल दूर

टॉनिकपेक्षा प्रभावी आहेत २० रूपयांच्या आत मिळणारे ६ पदार्थ; अशक्तपणा, रक्ताची कमतरता होईल दूर

Food for iron deficiency anemia: खूप अशक्तपणा, थकल्यासारखं वाटतं? टॉनिकपेक्षा जास्त प्रभावी २० रूपयांच्या आत मिळणारे ५ पदार्थ, आजपासूनच खा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 09:52 AM2022-02-01T09:52:29+5:302022-02-01T12:12:37+5:30

Food for iron deficiency anemia: खूप अशक्तपणा, थकल्यासारखं वाटतं? टॉनिकपेक्षा जास्त प्रभावी २० रूपयांच्या आत मिळणारे ५ पदार्थ, आजपासूनच खा

Food for iron deficiency anemia : 6 winter iron rich foods in your diet to manage hemoglobin level and beat anemia | टॉनिकपेक्षा प्रभावी आहेत २० रूपयांच्या आत मिळणारे ६ पदार्थ; अशक्तपणा, रक्ताची कमतरता होईल दूर

टॉनिकपेक्षा प्रभावी आहेत २० रूपयांच्या आत मिळणारे ६ पदार्थ; अशक्तपणा, रक्ताची कमतरता होईल दूर

अ‍ॅनेमिया (Anemia) हा अशक्तपणामुळे होणारा आजार आहे, जो जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतो. शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन तयार होत नाही तेव्हा हा आजार होतो. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमधील मुख्य प्रथिने आहे, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेते. (How to increase hemoglobin) जर तुम्हाला अशक्तपणा असेल तर तुमची हिमोग्लोबिन पातळी देखील कमी असेल. खूप महिला रोजच्या कामाच्या नादात स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे शरीरातलील पेशी कमी होणं, रक्ताची कमतरता अशा समस्या उद्भवतात. (6 winter iron rich foods in your diet to manage hemoglobin level and beat anemia)

लक्षणं (Symptoms of blood deficiency)

अ‍ॅनिमियाच्या लक्षणांमध्ये दम लागणं, थकवा, भूक न लागणे, एकाग्रता कमी होणे, केस गळणे, ठिसूळ नखे आणि हृदयाचे ठोके वाढणे यांचा समावेश होतो. महिला आणि मुलांमध्ये अॅनिमिया ही एक सामान्य समस्या आहे. मासिक पाळीत रक्त कमी झाल्यामुळे महिलांना अ‍ॅनिमिया होण्याची अधिक शक्यता असते. याशिवाय गर्भधारणेमध्येही हे होऊ शकते.

वृद्ध प्रौढांना अ‍ॅनेमियाचा धोका जास्त असतो कारण त्यांना किडनीचा आजार किंवा इतर जुने वैद्यकीय आजार असण्याची शक्यता असते. अकाली जन्म, मासिक पाळी, गरोदर राहणे आणि बाळंत होणे, जीवनसत्त्वे, खनिजे आणि लोह कमी असलेल्या पदार्थांचे सेवन, आयबुप्रोफेन सारखी औषधे, अनुवांशिक अशक्तपणा, आतड्यांसंबंधी रोग, कोणतीही शस्त्रक्रिया इत्यादीमुळे या आजाराचा धोका वाढू शकतो. हिवाळ्यात अशी काही फळे आणि भाज्या आहेत, ज्यांच्या नियमित सेवनाने तुम्ही अ‍ॅनिमिया दूर करून अ‍ॅनिमियापासून बचाव करू शकता.  (Natural Ways To Improve Haemoglobin)

सफरचंद 

आजारांपासून लांब राहण्यासाठी रोज एक सफरचंद खायला हवं असं डॉक्टर म्हणतात. कारण त्यात अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. सफरचंद हा लोहाचा समृद्ध स्रोत आहे. हे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी ओळखले जाते. लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी दररोज किमान एक सफरचंद खाणे आवश्यक आहे.

बीट

बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. ज्यांना लोहाची कमतरता आहे त्यांनी या भाजीचे सेवन जरूर करावे. त्याचा आहारात समावेश केल्यास हा आजार टाळता येतो. 100 ग्रॅम बीटरूटमध्ये 0.8 मिलीग्राम लोह आढळते.

डाळिंब

तुमचा ब्लड काऊंट वाढवण्यासाठी डाळिंब हे एक उत्तम फळ आहे. हे लोह, जीवनसत्त्वे A, C आणि E चा चांगला स्रोत आहे. या फळामध्ये असलेले एस्कॉर्बिक ऍसिड शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवते जे रक्ताचे प्रमाण नियंत्रित करते. डाळिंबाचा आहारात समावेश केल्याने तुमचे हिमोग्लोबिन वाढते. घरगुती डाळिंबाचा एक ग्लास रस कोणत्याही प्रक्रिया केलेल्या रसापेक्षा चांगला असतो.

पालक

पालकातही भरपूर प्रमाणात लोह असते. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास पालकाचा आहारात समावेश करावा. पालकामध्ये कॅल्शियम, सोडियम, खनिज क्षार, क्लोरीन, फॉस्फरस आणि प्रथिने यांसारखे घटक असतात.

 

लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, आपण आहारात नट्स, ड्रायफ्रुट्स समावेश केला पाहिजे. तुम्ही खजूर, अक्रोड, बदाम आणि मनुका यांसारखे ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. भिजवलेले मनुके आणि त्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने लोहाच्या कमतरतेवर मात करता येते.

Web Title: Food for iron deficiency anemia : 6 winter iron rich foods in your diet to manage hemoglobin level and beat anemia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.