lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > कडिपत्त्याच्या रोपाची वाढच खुंटली? ५ टिप्स लक्षात ठेवा- महिनाभरात बहरून जाईल कडिपत्ता

कडिपत्त्याच्या रोपाची वाढच खुंटली? ५ टिप्स लक्षात ठेवा- महिनाभरात बहरून जाईल कडिपत्ता

How to take care of curry leaves plant?: कडिपत्त्याच्या रोपाची वाढ चांगली होत नसेल तर हे काही सोपे घरगुती उपाय करून पाहा. महिनाभरातच कडिपत्त्याला नवा बहर येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2024 01:05 PM2024-03-02T13:05:20+5:302024-03-02T13:06:22+5:30

How to take care of curry leaves plant?: कडिपत्त्याच्या रोपाची वाढ चांगली होत नसेल तर हे काही सोपे घरगुती उपाय करून पाहा. महिनाभरातच कडिपत्त्याला नवा बहर येईल.

How to take care of curry leaves plant? 5 important tips for the growth of curry patta or kadipatta plant in marathi | कडिपत्त्याच्या रोपाची वाढच खुंटली? ५ टिप्स लक्षात ठेवा- महिनाभरात बहरून जाईल कडिपत्ता

कडिपत्त्याच्या रोपाची वाढच खुंटली? ५ टिप्स लक्षात ठेवा- महिनाभरात बहरून जाईल कडिपत्ता

Highlightsकडिपत्त्याच्या रोपाची थोडी छाटणी करून त्याला ज्या ठिकाणी भरपूर ऊन मिळेल, अशा ठिकाणी ठेवा. भरपूर ऊन असेल तर कडिपत्ता जोमात वाढतो. 

पदार्थांची चव खुलविण्यासाठी स्वयंपाकात नेहमी लागतो, तसेच आरोग्यासाठीही अतिशय महत्त्वाचा असतो, म्हणून आपण हौशेने आपल्या बागेत कडिपत्त्याचं रोप लावतो. पण नेमकं त्याचीच वाढ चांगली होत नाही. काही ठिकाणी कडिपत्ता नुसता काडीसारखा वाढत जाऊन उंच होतो. पण त्याला पानांचा मात्र पत्ताच नसतो. असं काही तुमच्या कडिपत्त्याच्या झाडाच्या बाबतीत होत असेल तर लगेचच पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा. कडिपत्त्याचं रोप थोड्याच दिवसात बहरून जाईल. (5 important tips for the growth of curry patta or kadipatta plant in marathi)

 

कडिपत्त्याच्या रोपाची कशी काळजी घ्यावी?

१. कडिपत्त्याचे रोप लावण्यासाठी आपण जी माती तयार करून त्यामध्ये शेण खत, माती आणि वाळू यांचं प्रमाण सारखं ठेवा. अशा प्रकारच्या मातीत कडिपत्ता चांगला वाढतो.

लग्नकार्यात घालायला छान ठसठशीत मंगळसूत्र घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे ८ सुंदर डिझाईन्स

२. कडिपत्त्याला अगदी रोजच्या रोज पाणी घालण्याची गरज नसते. त्यामुळे एक दिवसाआड त्याला पाणी द्या. जास्त पाण्यानेही कडिपत्त्याची वाढ खुंटते.

 

३. कडिपत्त्याच्या झाडाला दर दोन महिन्यांनी एकदा शेणखत जरूर खाला. यामुळे खूप चांगला परिणाम दिसून येईल.

रोज 'हे' ३ पदार्थ खा- केसांसाठी इतर कोणत्या ट्रिटमेंटची गरजच नाही, केस होतील दाट- लांब

४. ताक हे कडिपत्त्यासाठी सर्वोत्तम खत मानलं जातं. त्यामुळे १५ दिवसांतून एकदा पाणी आणि ताक एकत्र करून रोपाला घाला.

५. कडिपत्त्याच्या रोपाची थोडी छाटणी करून त्याला ज्या ठिकाणी भरपूर ऊन मिळेल, अशा ठिकाणी ठेवा. भरपूर ऊन असेल तर कडिपत्ता जोमात वाढतो. 

 

Web Title: How to take care of curry leaves plant? 5 important tips for the growth of curry patta or kadipatta plant in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.