लग्नकार्यात घालायला छान ठसठशीत मंगळसूत्र घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे ८ सुंदर डिझाईन्स

Published:March 2, 2024 09:12 AM2024-03-02T09:12:26+5:302024-03-02T09:15:02+5:30

लग्नकार्यात घालायला छान ठसठशीत मंगळसूत्र घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे ८ सुंदर डिझाईन्स

एरवी बऱ्याचजणी गळ्यात नाजूक मंगळसूत्र घालतात. किंवा बऱ्याच जणी घालतही नाहीत. पण लग्नकार्यात किंवा एखादा समारंभ असेल तर मात्र साडी नेसल्यावर गळ्यात एखादं ठसठशीत मंगळसूत्र पाहिजेच.

लग्नकार्यात घालायला छान ठसठशीत मंगळसूत्र घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे ८ सुंदर डिझाईन्स

म्हणूनच लग्नसराईच्या निमित्ताने तुम्हाला लांब, घनसर अशा मंगळसूत्राची खरेदी करायची असेल तर हे काही पर्याय एकदा बघा. यातले डिझाईन्स अगदी लेटेस्ट फॅशनचे स्टायलिश आहेत.

लग्नकार्यात घालायला छान ठसठशीत मंगळसूत्र घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे ८ सुंदर डिझाईन्स

हे बघा एक सुंदर स्टायलिश डिझाईन. एखाद्या डिझायनर साडीवर हे मंगळसूत्र घालायला छान आहे.

लग्नकार्यात घालायला छान ठसठशीत मंगळसूत्र घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे ८ सुंदर डिझाईन्स

हे मंगळसूत्रही अगदी नव्या फॅशनचं आहे. कारण त्याची मणी ओवण्याची पद्धत अतिशय वेगळी असून बघताक्षणीच ते लक्ष वेधून घेतं.

लग्नकार्यात घालायला छान ठसठशीत मंगळसूत्र घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे ८ सुंदर डिझाईन्स

असं हेवी पेंडंट असणारं एकच मंगळसूत्र गळ्यात घातलं तरी खूप छान वाटेल. इतर कोणत्या दागिन्याची गरजच नाही.

लग्नकार्यात घालायला छान ठसठशीत मंगळसूत्र घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे ८ सुंदर डिझाईन्स

हे एक थोडं वेगळं डिझाईन पाहा. यामध्ये पारंपरिक वाट्या किंवा पेंडंटऐवजी छोटासा चंद्र आणि चांदण्यांचं नाजूक डिझाईन देण्यात आलं आहे.

लग्नकार्यात घालायला छान ठसठशीत मंगळसूत्र घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे ८ सुंदर डिझाईन्स

या मंगळसूत्राचं पेंडंट बघा. अतिशय युनिक डिझाईन आहे. दोन्ही बाजूला दाेन हत्ती आणि मध्यभागी झुमका असं डिझाईन नक्कीच चारचौघीत उठून दिसणारं आहे.

लग्नकार्यात घालायला छान ठसठशीत मंगळसूत्र घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे ८ सुंदर डिझाईन्स

हेवी पेंडंट असणारं हे आणखी एक डिझाईन् तुम्हाला आवडू शकतं.