lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > आम तो आम…. आंब्याची सालही खास! करा 'असा' वापर; बागेतलं एकेक झाड फुलाफळांनी बहरेल

आम तो आम…. आंब्याची सालही खास! करा 'असा' वापर; बागेतलं एकेक झाड फुलाफळांनी बहरेल

How to make Mango Peels Fertilizer for any plants : आंब्याची साल फेकून देत असाल तर, एकदा 'या' पद्धतीने झाडांवर करून पाहा वापर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2024 06:51 PM2024-05-03T18:51:50+5:302024-05-03T19:00:55+5:30

How to make Mango Peels Fertilizer for any plants : आंब्याची साल फेकून देत असाल तर, एकदा 'या' पद्धतीने झाडांवर करून पाहा वापर..

How to make Mango Peels Fertilizer for any plants | आम तो आम…. आंब्याची सालही खास! करा 'असा' वापर; बागेतलं एकेक झाड फुलाफळांनी बहरेल

आम तो आम…. आंब्याची सालही खास! करा 'असा' वापर; बागेतलं एकेक झाड फुलाफळांनी बहरेल

उन्हाळा सुरु होताच बाजारात आंब्याचा घमघमाट पसरतो (Summer Special). असे फार कमी लोक असतील ज्यांना आंबा खायला आवडत नसेल. फळांचा राजा, अर्थात आंबा खाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे (Mango Peels). पण आंब्याचा गर खाऊन लोक कोय आणि साली फेकून देतात (Fertilizer). पण सालीचे देखील अनेक फायदे आहेत. आंबा जितका रसाळ आणि मधुर असतो, तितकीच फायदेशीर त्याची सालंही असतात.

आंब्याच्या सालीमध्ये अनेक नैसर्गिक घटक आढळते. शिवाय त्यात कॉपर, फोलेट आणि जीवनसत्त्वे, बी६, ए आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात. आंब्याच्या सालीचे वापर अनेक आहेत. आपण याचा वापर झाडांच्या खतासाठीही करू शकता. यामुळे कुंडीतल्या झाडांची योग्य वाढ होईल(How to make Mango Peels Fertilizer for any plants).

आंब्याची साल फेकू नका, खत म्हणून त्याचा वापर करा

लागणारं साहित्य

आंब्याची साल

पाणी

आंब्याच्या सालीचे खत तयार करण्याची पद्धत

लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा १ खत; झाड वाढेल भरभर - रसाळ लिंबांनी लगडेल झाड

आंब्याच्या सालीचे खत तयार करण्यासाठी, प्रथम आंब्याची साल एका बाऊलमध्ये गोळा करून ठेवा. नंतर साली चिरून घ्या. एका कढईत पाणी उकळवण्यासाठी ठेवा. नंतर त्यात साली घालून शिजवून घ्या. १५ मिनिटानंतर गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यानंतर त्यातून साली एका प्लेटमध्ये काढून घ्या, आणि आंब्याच्या साली वाळवण्यासाठी उन्हाखाली ठेवा. आपण याचा वापर खत म्हणून करू शकता.

अशाप्रकारे करा आंब्याच्या खताचा वापर

- झाडांच्या आजूबाजूची माती उकरून काढा, आणि त्यात सुमारे एक चमचा आंब्याच्या सालीचे खत हातात घेऊन शिंपडा. आता ती माती पुन्हा वरच्या बाजूने पसरवा.

- महिन्यातून एकदा आंब्याच्या सालीच्या खताचा वापर कुंडीतल्या मातीत करा. सालीच्या गुणधर्मामुळे झाडाला फायदे होतो. ज्यामुळे फळे  झाडांच्या उंचीनुसार खताची मात्रा वाढवू शकता.

आंब्याच्या सालीचा स्प्रे

कीड लागून झाडं सुकायला लागलीय? किचनमधल्या २ गोष्टींचा करा 'असा' वापर; रोप वाढेल आणि..

- सुकलेली आंब्याची साल मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची पावडर तयार करा. एका बॉटलमध्ये एक कप पाणी घाला. त्यात एक चमचा हिंग घाला. हिंग पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यात आंब्याच्या सालीची पावडर मिसळून दोन ते तीन दिवस राहू द्या.

- २ ते ३ दिवसांनी हे पाणी फवारणीच्या बाटलीत भरून नंतर ते झाडांसाठी वापरा. उन्हाळ्यात झाडाची वाढ होण्यासाठी आपण हे पाणी वापरू शकता. 

Web Title: How to make Mango Peels Fertilizer for any plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.