Lokmat Sakhi >Gardening > कीड लागून झाडं सुकायला लागलीय? किचनमधल्या २ गोष्टींचा करा 'असा' वापर; रोप वाढेल आणि..

कीड लागून झाडं सुकायला लागलीय? किचनमधल्या २ गोष्टींचा करा 'असा' वापर; रोप वाढेल आणि..

How to get rid of those annoying insects in indoor plants : झाडं निरोगी ठेवायची असतील तर, झाडांना कीड लागण्यापासून वाचवायला हवं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2024 06:30 PM2024-04-14T18:30:57+5:302024-04-14T18:33:20+5:30

How to get rid of those annoying insects in indoor plants : झाडं निरोगी ठेवायची असतील तर, झाडांना कीड लागण्यापासून वाचवायला हवं...

How to get rid of those annoying insects in indoor plants | कीड लागून झाडं सुकायला लागलीय? किचनमधल्या २ गोष्टींचा करा 'असा' वापर; रोप वाढेल आणि..

कीड लागून झाडं सुकायला लागलीय? किचनमधल्या २ गोष्टींचा करा 'असा' वापर; रोप वाढेल आणि..

ऋतू कोणताही असो, झाडांची योग्य काळजी घेतली नाही तर, त्याला कीड लागते (Indoor Plants). बऱ्याचदा कीटकांच्या हल्ल्यामुळे रोप खराब होते. त्यामुळे झाडांची नियमित काळजी घ्यायला हवी (Gardening Tips). उन्हाळ्यात झाड सुकते, नियमित पाणी न मिळाल्यास काळपट पडते. शिवाय रोपांना कीड लागते. जर आपल्या घरातील झाडे कीटकांनी ग्रस्त असतील, तर बाजारात उपलब्ध असणाऱ्या कीटकनाशकांचा वापर करण्यापेक्षा घरगुती उपाय करून पाहा.

या उपायामुळे रासायनिक उत्पादनांची गरज भासणार नाही. शिवाय घरगुती उपायामुळे रोपाजवळ कीटकही फिरणार नाही. बऱ्याचदा हे कीटक एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातात. ज्यामुळे दुसऱ्या झाडाचे देखील नुकसान होते. त्यामुळे घरातल्या ४ गोष्टींचा वापर करून झाडावरच्या कीटकांना पळवून लावा(How to get rid of those annoying insects in indoor plants).

झाडांना कीड लागल्यास..

हळद

हळद फक्त स्वयंपाकासाठी नसून, झाडांवरील कीटकांना पळवून लावण्यासही मदत करते. हळदीमधील अनेक गुणधर्म आढळते, जे कीटकांना झाडांपासून दूर ठेवण्याचे काम करतात. यासाठी झाडांना आधी पाण्याने आंघोळ घाला. काही वेळानंतर मातीत चमचाभर हळद मिक्स करा. यामुळे रोपाची उत्तम वाढ होईल, शिवाय कीटकांपासूनही सुरक्षित राहील.

माठात राहील फ्रिजसारखं पाणी थंड! फक्त त्यात १ चमचा पांढरी गोष्ट मिसळा; फ्रिजचं पाणी विसराल

भाज्या आणि फळांच्या सालींचा वापर करा

बहुतांश लोक भाज्या आणि फळांची साल फेकून देतात. पण ही सालं फेकून न देता, आपण याचा वापर खत म्हणूनही करू शकता. यासाठी एका डब्यात भाज्या आणि फळांच्या साली जमा करून ठेवा. नंतर याचा वापर खत म्हणून करा. यासाठी मातीत खत घालून मिक्स करा. नंतर पाणी घाला. यामुळे झाडाची योग्य वाढ होईल, शिवाय कीटकही फिरकणार नाही.

अर्ध्या लिंबूने सहज निघेल पायाचे टॅनिंग, फक्त लिंबाला ३ गोष्टी लावून रगडा, पाहा चमक

खराब पानं छाटून काढा

जर झाडांची पानं पिवळी पडली असतील तर, छाटून काढा. वेळोवेळी पिवळी पानं छाटून काढल्यास, झाड छान फुलेल. शिवाय रोपावर कीटक फिरकणार नाही. पिवळ्या पानांमुळे झाडाची वाढ खुंटते. शिवाय त्यावर कीटकही फिरतात. त्यामुळे झाडाची पिवळी पानं छाटत राहा. 

Web Title: How to get rid of those annoying insects in indoor plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.