lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा १ खत; झाड वाढेल भरभर - रसाळ लिंबांनी लगडेल झाड

लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा १ खत; झाड वाढेल भरभर - रसाळ लिंबांनी लगडेल झाड

How to take care of a lemon plant at home : पिवळ्याधमक लिंबाने बहरेल झाड, फक्त रोपट्याला पाणी घालण्याची योग्य पद्धत पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2024 10:00 AM2024-04-25T10:00:00+5:302024-04-25T10:00:01+5:30

How to take care of a lemon plant at home : पिवळ्याधमक लिंबाने बहरेल झाड, फक्त रोपट्याला पाणी घालण्याची योग्य पद्धत पाहा..

How to take care of a lemon plant at home | लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा १ खत; झाड वाढेल भरभर - रसाळ लिंबांनी लगडेल झाड

लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा १ खत; झाड वाढेल भरभर - रसाळ लिंबांनी लगडेल झाड

उन्हाळा सुरु झाला, की लिंबूचे भाव वाढतात (Gardening Tips). अशावेळी इच्छा असूनही आपण घरात जास्त प्रमाणात लिंबू आणू शकत नाही. लिंबूचा वापर अनेक पदार्थांमध्ये होतो. उन्हाळ्यात लिंबू पाणी किंवा लिंबाचं लोणचं आवडीने खाल्ले जाते (Lemon tree). त्यात अनेक गुणधर्म असतात. मुख्य म्हणजे लिंबू हे व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत आहे. पण लिंबू महाग मिळत असल्याकरणाने आपण घेणं टाळतो.

महागडे लिंबू घेण्यापेक्षा आपण घरातच लिंबूचे झाड लावू शकता. अनेक लोक घरात लिंबाचे झाड लावतात. कुंडीतल्या रोपाला बऱ्याचदा लिंबू येत नाही. जर घरातल्या झाडाला लिंबू येत नसतील तर, ७ टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे कुंडीतल्या झाडाला रसरशीत लिंबू येतील. शिवाय झाड छान फुलेल(How to take care of a lemon plant at home).

लिंबाच्या झाडाची लागवड करण्यासाठी टिप्स

मनी प्लांटवर बुरशी -पानंही पिवळी पडतात? कुंडीतल्या मातीत मिसळा फुकट मिळणारी १ गोष्ट; दिसेल जादू

- लिंबाचे झाड कुंडीत लावण्यासाठी मोठी कुंडी घ्या. तळाशी एक लहान छिद्र असणे आवश्यक आहे. जेणेकरून जास्तीचे पाणी बाहेर पडू शकेल.

- प्रथम, कुंडीत थोडी माती टाका. पाणी घालून माती थोडी ओली करा. नंतर त्यात बियाणे घाला. नंतर त्यात सेंद्रिय खत मिसळा. यामुळे बियाण्यांनाही पूर्ण पोषण मिळेल.

- आपण मोठ्या आकाराचे लिंबू घेऊ शकता. त्यातील बिया काढा आणि मातीत मिसळा. काही बिया खराब होतात आणि अंकुर वाढू शकत नाहीत. त्यामुळे ६ ते ७ बिया मातीत मिसळा.

- जमिनीत घालण्यापूर्वी बिया पाण्याने धुवाव्यात. जेणेकरून चिकटपणा दूर होईल. यामुळे बिया खराब होणार नाहीत. नंतर मातीत थोडे पाणी घाला.

- आता कुंडी थेट सूर्यप्रकाशाजवळ ठेऊ नका.  थेट सूर्यप्रकाश टाळण्यासाठी कुंडी प्लास्टिकने कव्हर करा.

तुळस काळी पडते, लगेच वाळते? चमचाभर मिठाचा सोपा उपाय; तुळशीजवळ कीटक फिरकणारही नाही

- साधारण दोन आठवड्यात बियाण्यांमधून अंकुर निघण्यास सुरवात होईल. आपण दररोज प्लास्टिकचे कव्हर काढून थोडेसे पाणी घालू शकता. एकाच वेळी जास्त पाणी घालू नका.

- बियांमधून कोंब बाहेर आल्यानंतर प्लास्टिक काढून टाका. जेथे समान सूर्यप्रकाश असेल तेथे कुंडी ठेवा. दर दोन दिवसांच्या अंतराने पाणी द्या. जसजसे झाड वाढत जाईल तसतसे त्याला पाणी आणि मातीत खत मिसळा. या टिप्स फॉलो केल्याने काही दिवसात झाडाला रसरशीत लिंबू येतील.

Web Title: How to take care of a lemon plant at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.