अनेकांना आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा गच्चीवर वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावण्याची मोठी हौस आणि इच्छा देखील असते. या रोपांमध्ये बरेचदा आपण अशी काही रोप लावतो जी आपल्या फायदयाची असतात, जसे की मिरचीचे रोप... एकदा का मिरचीचे रोप लावले की मिरच्या विकत आणायची झंझटच रहात नाही, कायमच घराच्या कुंडीत लावलेल्या रोपाला येणाऱ्याच मिरच्या आपण वापरतो. मोठ्या हौसेने आपण कुंडीत मिरचीचं रोप लावतो, त्याची काळजी घेतो, पाणी घालतो; पण कित्येक दिवस झाले तरी रोपाला मिरची काही लागत नाही. कधी फुले येतात आणि गळून पडतात, तर कधी झाडाची वाढच खुंटते. त्यामुळे मेहनत करूनही हवा तसा परिणाम न मिळाल्याने अनेकजण नाराज होतात. मिरचीच्या रोपाची बरीच काळजी घेऊनही काही केल्या रोपाला मिरच्याच येत नाही. अशावेळी काही सोपे आणि घरगुती उपाय रोपाची वाढ सुधारण्यास आणि भरपूर मिरच्या येण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात(homemade fertilizer for chilli plant).
स्वयंपाकघरातच असे काही पदार्थ आहेत, जे मिरचीच्या रोपासाठी 'जादू' ठरू शकतात. स्वयंपाकघरातील असे कोणते पदार्थ आहेत, ज्यामुळे रोप मिरच्यांनी पूर्णपणे बहरुन येईल. महागड्या (how to use jaggery and besan for chilli plant growth) खतांशिवाय घरच्याघरीच उपलब्ध असलेल्या पदार्थांपासूनच (homemade organic fertilizer for more chillies in pots) मिरचीच्या रोपासाठी घरगुती खत कसं तयार करायचं ते पाहूयात.
मिरचीच्या रोपासाठी घरगुती खत कसं तयार करायचं...
मिरचीच्या रोपासाठी सेंद्रिय खत तयार करण्यासाठी आपल्याला फक्त तीन गोष्टींची गरज आहे. एक ग्लास पाणी, एक चमचा बेसन आणि गुळाचा एक छोटा तुकडा. बेसन हे प्रोटीन आणि सूक्ष्म पोषक घटकांचा एक उत्तम स्रोत आहे, तर गूळ हे रोपाला ऊर्जा आणि कार्बन देण्याचे काम करतो. या दोन्हीचे मिश्रण रोपांसाठी एखाद्या 'सुपरफूड' प्रमाणे काम करते. सर्वात आधी एका ग्लास पाण्यात बेसन आणि गूळ टाका. त्यानंतर हे मिश्रण जोपर्यंत त्यातील गुठळ्या पूर्णपणे संपत नाहीत, तोपर्यंत नीट ढवळून घ्या.
स्टिल - पितळ की माती...कोणत्या भांड्यात दूध तापवावं ? 'या' भांड्याचा करा उपयोग - साय येईल जाडजूड...
हे द्रावण तयार केल्याबरोबर लगेच मातीत टाकण्यापेक्षा, ते मुरवून किंवा आंबवून (Fermentation) वापरणे जास्त फायदेशीर ठरते. तयार केलेले हे मिश्रण ३ ते ४ दिवसांसाठी एखाद्या सावलीच्या ठिकाणी ठेवून द्या. या ३ ते ४ दिवसाच्या काळात गुळातील गोडव्यामुळे बेसनामध्ये असलेले पोषक घटक ॲक्टिव्ह होतात आणि नैसर्गिक बॅक्टेरिया वाढू लागतात. ही प्रक्रिया या मिश्रणाला एका 'प्रोबायोटिक ड्रिंक' मध्ये बदलते, जे तुमच्या रोपांच्या मातीसाठी अत्यंत आरोग्यदायी ठरते.
मिरचीच्या रोपांचा हिरवागार बहर आणि उत्तम वाढ टिकवून ठेवण्यासाठी सर्वात जास्त नायट्रोजनची (Nitrogen) गरज असते. बेसनामध्ये असलेले नायट्रोजन जेव्हा मातीत मिसळले जाते, तेव्हा ते रोपाच्या मुळांना कमालीची मजबुती देते आणि पानांचा रंग गडद हिरवा करण्यास मदत करते. जेव्हा रोपाला पुरेसे नायट्रोजन मिळते, तेव्हा त्याची प्रकाश संश्लेषण (Photosynthesis) क्रिया वेगवान होते, ज्यामुळे रोप अधिक सुदृढ, निरोगी आणि डेरेदार बनते.
गुळामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स मातीतील सूक्ष्म जीवाणूंना ॲक्टिव्ह करतात, ज्यामुळे झाडांना मातीतील पोटॅशियम आणि फॉस्फरस शोषून घेण्यास मदत होते. यामुळे केवळ फुलांची संख्याच वाढत नाही, तर ती गळून न पडता वेगाने मोठ्या आणि तिखट मिरच्यांमध्ये रूपांतरित होतात.
बाजारातील रासायनिक खते बऱ्याचदा मातीचा कस कमी करतात आणि तिला निर्जीव बनवतात, मात्र हे बेसन-गुळाचे द्रावण मातीला खऱ्या अर्थाने जिवंत करते. हे द्रावण मातीतील 'बेनिफिशियल बॅक्टेरिया' म्हणजेच उपयुक्त जीवाणूंची संख्या लाखो पटीने वाढवते. हे जीवाणू मातीमध्ये लपलेले पोषक घटक सुटे करून ते थेट रोपांच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात, ज्यामुळे मातीचा सुपीकपणा दीर्घकाळ टिकून राहतो. द्रावण टाकण्यापूर्वी कुंडीतील माती हलकीशी खुरपून घ्या जेणेकरून हे मिश्रण मुळांपर्यंत खोलवर पोहोचू शकेल. हे द्रावण खूप जास्त प्रमाणात टाकू नका; प्रत्येक कुंडीसाठी अर्धा ग्लास द्रावण पुरेसे आहे.
मिरचीचे रोप भराभर वाढण्यासाठी आणि त्याला भरपूर हिरव्यागार मिरच्या येण्यासाठी बेसन आणि गुळाचे खत घालण्याच्या नैसर्गिक उपाय madhuri36351 या इंस्टाग्रामवरील अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
Web Summary : If chili plants aren't producing, a homemade jaggery and gram flour fertilizer can help. This mix provides essential nutrients, promoting robust growth and abundant fruit. Fermenting the mixture enhances its probiotic benefits for the soil.
Web Summary : यदि मिर्च के पौधे में फल नहीं लग रहे हैं, तो घर का बना गुड़ और बेसन का खाद मदद कर सकता है। यह मिश्रण आवश्यक पोषक तत्व प्रदान करता है, जिससे पौधे का विकास होता है और भरपूर फल लगते हैं। मिश्रण को किण्वित करने से मिट्टी के लिए इसके प्रोबायोटिक लाभ बढ़ जाते हैं।