दही हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. दही भात, दही पोळी, दही पराठा, दही थालिपीठ असे काही पदार्थ नुसते ऐकले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. काही जणांना तर रोजच्या जेवणात दह्याची वाटी हवीच असते. दही खाणं अतिशय आरोग्यदायीही आहेच. कारण त्यामध्ये असणारे प्रोबायोटिक्स किंवा चांगले बॅक्टेरिया पचनासाठी मदत करतात शिवाय ते आरोग्यदायीही असतात. पण चुकीच्या पद्धतीने दही लावले किंवा दही साठवून ठेवताना काही गोष्टी चुकीच्या झाल्या तर मग मात्र दह्याची पौष्टिकता कमी होऊ शकते. मग असं दही अगदी रोज खाल्लं तरी त्यामुळे शरीराला कोणताही फायदा होत नाही. म्हणूनच दही लावताना किंवा साठवून ठेवताना कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या ते पाहूया..(wrong method of storage of curd can destroy its good bacteria)
दह्यामधले पौष्टिक घटक कमी होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?
१. दही जर पौष्टिक व्हावं असं वाटत असेल तर दही लावण्याची पारंपरिक पद्धत जी आहे ती पाळा. विरझन वापरून दही लावा. झटपट दही लावण्यासाठी किंवा विरझन नसतानाही दही लावण्यासाठी हल्ली कित्येक वेगवेगळे उपाय सांगितले जातात. ते टाळावे आणि पारंपरिक पद्धतीनेच दही लावावे.
मुलं ठेंगणी राहू नयेत म्हणून 'या' वयात त्यांची काळजी घ्या, मुलांची उंची भराभर वाढण्यासाठी ४ टिप्स..
२. दही एकदा लागलं की ते सेट होण्यासाठी काही वेळ फ्रिजमध्ये नक्की ठेवा. दही जास्त आंबट झालं तर त्याची पौष्टिकता कमी होत जाते. तसेच दही नेहमीच झाकून ठेवावं.
३. दही लावल्यानंतर ते जास्तीतजास्त २ ते ३ दिवस वापरावं. हळूहळू ते जास्त आंबट होत जातं आणि त्याचा पौष्टिकपणाही कमी कमी होत जातो. त्यामुळे जास्त शिळं दही वापरू नये.
४. दह्यामध्ये ओला चमचा घालणं टाळावं. कारण यामुळे ते खराब होऊ शकतं. शिवाय दह्याच्या बाबतीत ही समस्या असते की ते खराब झालेलं असलं तरी लवकर दिसून येत नाही. त्यामुळे ते घेताना स्वच्छतेच्या बाबतीत थोडी जास्त काळजी घेणं चांगलं.