Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Winter Special Recipe : पौष्टिक गाजर पचडी करायची सोपी रेसिपी, १० मिनिटांत करा आणि खा पोटभर

Winter Special Recipe : पौष्टिक गाजर पचडी करायची सोपी रेसिपी, १० मिनिटांत करा आणि खा पोटभर

Winter Special Recipe: Easy recipe for nutritious carrot pachdi, make it in 10 minutes : गाजराची कोशिंबीर करायची सोपी पद्धत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2025 11:21 IST2025-11-16T11:19:59+5:302025-11-16T11:21:32+5:30

Winter Special Recipe: Easy recipe for nutritious carrot pachdi, make it in 10 minutes : गाजराची कोशिंबीर करायची सोपी पद्धत.

Winter Special Recipe: Easy recipe for nutritious carrot pachdi, make it in 10 minutes | Winter Special Recipe : पौष्टिक गाजर पचडी करायची सोपी रेसिपी, १० मिनिटांत करा आणि खा पोटभर

Winter Special Recipe : पौष्टिक गाजर पचडी करायची सोपी रेसिपी, १० मिनिटांत करा आणि खा पोटभर

थंडीत छान ताजी गाजरे मिळतात. हंगामी पदार्थ खायलाच हवेत. फार पौष्टिक तर असतातच पण चवही जास्त चांगली असते. गाजर खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते कारण त्यात बीटा-कॅरेटीन, जीवनसत्त्व ए, सी, के, बी६, पोटॅशियम आणि फायबर यांसारखी महत्त्वाची पोषणतत्त्वे असतात. (Winter Special Recipe: Easy recipe for nutritious carrot pachdi, make it in 10 minutes    )गाजरातील बीटा-कॅरेटीन शरीरात जीवनसत्त्व ए मध्ये रुपांतरित होऊन दृष्टी सुधारते आणि डोळे निरोगी ठेवते. अँटी ऑक्सिडंट्स व जीवनसत्त्व सी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात, तर फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारते. गाजर कमी कॅलरीचे आणि जास्त फायबरयुक्त असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते, तसेच त्वचा उजळ, मऊ आणि निरोगी ठेवण्यातही गाजरातील अँटी ऑक्सिडंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे दैनंदिन आहारात गाजराचा समावेश केल्यास संपूर्ण आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. 

त्यामुळे या पद्धतीने गाजराची पचडी करुन खाणे पोषण ठरते. तसेच चवही एकदम छान असते. एकदा नक्की करुन पाहा. 

साहित्य 
गाजर, हिरवी मिरची, हिंग, तेल, मोहरी, जिरे, हळद, कोथिंबीर, मीठ, साखर, लाल तिखट

कृती
१. गाजर सोलून घ्यायचे. सोलून झाल्यावर छान किसून घ्यायचे. केशरीपेक्षा लाल गाजर वापरा. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची. निवडून घ्या आणि मग बारीक चिरायची. 

२. एका कढईत अगदी चमचाभर तेल घ्यायचे. त्यात चमचाभर जिरे घालायचे. तसेच चमचाभर मोहरी घालायची. जिरे छान फुलू  द्यायचे आणि मोहरी मस्त तडतडू द्यायची. त्यात चमचाभर हिंग घालीयचे. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. ते तुकडेही फोडणीत घालायचे. चमचाभर साखर घालायची. 

३. चमचाभर हळद घालायचे. त्यात किसलेले गाजर घालायचे आणि जरा दोन मिनिटे परतायचे. त्यात भरपूर कोथिंबीर घालायची. छान ढवळायचे आणि मग परतून घ्यायचे. चमचाभर लाल तिखट घालायचे. नाही घातले तरी हरकत नाही. तिखट जेवढे झेपेल त्यानुसार हिरवी मिरची आणि लाल तिखट घालायचे. 

Web Title : विंटर स्पेशल गाजर पचड़ी: 10 मिनट में बनाएं पौष्टिक और स्वादिष्ट

Web Summary : इस सर्दी में ताज़े गाजर के साथ एक सरल, पौष्टिक पचड़ी का आनंद लें। गाजर विटामिन और एंटीऑक्सीडेंट से भरपूर होते हैं, जो प्रतिरक्षा को बढ़ाते हैं और पाचन में सुधार करते हैं। यह आसान रेसिपी सिर्फ 10 मिनट में बनती है!

Web Title : Winter Carrot Pachadi: Quick, Nutritious, and Delicious Recipe in 10 Minutes

Web Summary : Enjoy fresh carrots this winter with a simple, nutritious pachadi. Carrots are rich in vitamins and antioxidants, boosting immunity and improving digestion. This easy recipe takes just 10 minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.