Side Effects of Beetroot: बिटाचा समावेश सुपरफूडमध्ये केला जातो. कारण यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत मिळते. बिटाचे इतके फायदे आहेत, ज्यातील बरेच लोकांना माहीत देखील नसतात. पण तरीही लोक आवडीनं बीट खातात किंवा ज्यूस पितात. बिटाचा गर्द लाल रंग, मातीसारखा सुगंध आणि यातील गुण बिटाला सुपरफूड बनवतात.
बीट नियमितपणे खाल्ल्यास शरीरात रक्त वाढतं, ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं आणि शरीरही डिटॉक्स होतं. पण अनेक फायदे असूनही बीट काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. काही खास आजारांमध्ये बीट खाल्ल्यास समस्या अधिक वाढू शकते. चला तर पाहुया कोणत्या स्थितीत खाऊ नये बीट.
किडनी स्टोन
किडनी स्टोनची समस्या असेल तर बीट अजिबात खाऊ नये. कारण यात ऑक्सालेटचं प्रमाण अधिक असतं. हे ऑक्सालेट तत्वच कॅल्शिअमसोबत मिळून किडनीमध्ये स्टोन तयार करतं. जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल किंवा आधी होऊन गेली असेल तर बीट कमी प्रमाणात खावं किंवा खाऊच नये.
लो ब्लड प्रेशर
बिटामध्ये नाइट्रेट्स असतं, जे शरीरात जाऊन नायट्रिक ऑक्साइडमध्ये बदलतं आणि रक्तवाहिन्या पसरवतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं. जर आधीच कुणाला हाय बीपी किंवा लो बीपीची समस्या असेल तर त्यांना बीट खाल्ल्यावर चक्कर येणे, कमजोरी आणि बेशुद्ध पडणे अशा समस्या होऊ शकतात.
डायबिटीसच्या रूग्णांसाठी घातक
बिटामध्ये भरपूर नॅचरल शुगर असते, पण याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यमपेक्षा जास्त असतो. त्यामुळे बीट जर जास्त खाल तर ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. डायबिटीसच्या रूग्णांनी बीट कमी प्रमाणात खायला हवेत आणि खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आयर्न जास्त होईल
बिटामध्ये आयर्नचं प्रमाणही भरपूर असतं, पण ज्या लोकांच्या शरीरात आधीच आयर्न ओव्हरलोड आहे, म्हणजे हेमोक्रोमॅटोसिसची समस्या आहे त्यांच्यासाठी बीट खाणं नुकसानकारक ठरू शकतं.
अॅलर्जी किंवा संवेदनशील पोट असलेले
काही लोकांना बिटानं अॅलर्जी, स्किन रिअॅक्शन, गॅस किंवा डायरिया यांसारक्या समस्या होऊ शकतात. ही लक्षणं दिसताच वेळीच डॉक्टरांना संपर्क केला पाहिजे.
भलेही बीट एक सुपरफूड असेल, पण प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य आणि शरीराची गरज वेगळी असते. जर आपल्याला वरील कोणत्याही समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बीट खाऊ नये. हेल्दी खाण्याचा हा अर्थ होत नाही की, ते प्रत्येकासाठी सेफ असू शकतं.