बदाम हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक मानले जातात. बुद्धीसाठी बदाम उत्तम. लहान मुलांच्या आहारात असायलाच हवेत. त्यामुळे अनेक जण सकाळच्या आहारात किंवा रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे दूध पिणे पसंत करतात. बदामामध्ये प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम, चांगले फॅट्स आणि शरीरासाठी आवश्यक अनेक पोषक घटक असतात. (Why do actresses from Anushka Sharma to Tamannaah Bhatia drink almond milk? perfect recipe )त्यामुळे बदामाचे दूध हे चविष्ट तर असतेच, पण शरीराला ताकद देणारेही ठरते. विशेषतः लहान मुले, विद्यार्थी आणि कामाचा ताण जास्त असणाऱ्यांसाठी हे दूध फायदेशीर मानले जाते. अनुष्का शर्मालाही हे दूध फार आवडते आणि ती ते घरीच तयार करणे योग्य मानते.
बदामाचे दूध घरी अगदी सहज तयार करता येते. त्यासाठी १० ते १२ बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी त्यांची सालं काढून घ्यावीत. त्यानंतर हे बदाम मिक्सरमध्ये घालून त्यात दोन कप कोमट दूध टाकावे. चवीनुसार खजूर, मध किंवा थोडी साखर घालू शकता. वेलची पूड किंवा केशर घातल्यास दुधाची चव अधिक छान लागते. हे मिश्रण व्यवस्थित फिरवून घेतल्यावर पौष्टिक बदामाचे दूध तयार होते. हे दूध गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे पिता येते. काहीही न घालता वाटून घेतले आणि पाणी घालून गाळले तरी छान दूध तयार होते.
बदामाचे दूध नियमित प्यायल्यास शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. दिवसभर थकवा कमी जाणवतो आणि शरीर उत्साही राहते. बदाम स्मरणशक्तीसाठीही फायदेशीर मानले जातात. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हे दूध विशेष उपयुक्त ठरू शकते. यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करते. तसेच बदामातील व्हिटामिन ई त्वचेला पोषण देऊन त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करते.
पचनासाठीही बदामाचे दूध चांगले मानले जाते. हलके आणि पौष्टिक असल्यामुळे अनेकांना हे दूध सहज पचते. यामध्ये असलेले चांगले फॅट्स हृदयासाठीही फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे रोजच्या आहारात बदामाच्या दुधाचा समावेश केल्यास शरीराला अनेक प्रकारे फायदा मिळू शकतो. स्वाद आणि आरोग्य यांचा उत्तम संगम असलेले बदामाचे दूध हे एक उत्तम पौष्टिक पेय मानले जाते.
Web Summary : Almond milk, rich in nutrients, is favored by actresses like Anushka Sharma. Easy to make at home, it boosts energy, aids digestion, strengthens bones, and enhances skin health. A delicious and healthy drink.
Web Summary : बादाम दूध, पोषक तत्वों से भरपूर, अनुष्का शर्मा जैसी अभिनेत्रियों को पसंद है। घर पर बनाना आसान है, यह ऊर्जा बढ़ाता है, पाचन में मदद करता है, हड्डियों को मजबूत करता है और त्वचा के स्वास्थ्य को बढ़ाता है। एक स्वादिष्ट और स्वस्थ पेय।