किमची हा कोरियाचा प्रसिद्ध पारंपरिक पदार्थ असून तो प्रामुख्याने फर्मेंटेड भाज्यांपासून तयार केला जातो. यात मुख्यत: चायनीज कोबी, गाजर, लसूण, आलं, मिरची आणि मीठ वापरले जाते. फर्मेंटेशनमुळे त्याला एक वेगळी आंबट–तिखट चव येते आणि तो पचनासाठी खूप फायदेशीर मानला जातो. (What exactly is Korean kimchi? Check out this delicious recipe, the craze for this dish is growing all over the world!!)किमचीमध्ये प्रोबायोटिक्स, जीवनसत्वे आणि अँटी ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. तो भात, सुप, नूडल्स किंवा इतरही पदार्थांसोबत खाल्ला जातो. कोरियात किमची हा रोजच्या जेवणाचा आवश्यक भाग असून त्याला सांस्कृतिक महत्त्वही आहे. घरी किमची करणे अगदीच सोपे आहे. एकदा हा पदार्थ नक्की करुन पाहा.
साहित्य कोरियन कोबी, (नाही मिळाला तर साधाही चालेल), मीठ, पाणी, लसूण, कांदा, पेर, गाजर, तांदूळाचे पीठ, लाल तिखट, कांद्याची पात, सोया सॉस, चिलीफ्लेक्स, पांढरे तीळ
कृती१. लेटसचे मोठे तुकडे करायचे. लेटस नसेल तर कोबी घ्यायचा. एका पातेल्यात मीठ पाणी तयार करायचे. त्यात लेटसचे तुकडे घालायचे आणि धुवायचे. अर्धा तास तसेच ठेवायचे. मग व्यवस्थित धुवायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. पेरचे तुकडे करायचे. कांद्याचेही दोन भाग करायचे.
२. एका पॅनमध्ये तांदूळाचे पीठ घ्यायचे. त्यात पाणी घालायचे आणि उकळवायचे. त्याची घट्ट पेस्ट तयार होईल. एका मिक्सरच्या भांड्यात ती पेस्ट घ्यायची. त्यात कांदा घालायचा. लसूण घालायचा आणि पेर घालायचा. वाटून त्याची पेस्ट तयार करायची. पाणी घालू नका. घट्टच पेस्ट करायची. त्यात सोया सॉस घालायचा. चिलीफ्लेक्स घालायचे. पेस्ट एकजीव करायची. लाल तिखटही घालायचे. त्याचा सॉस तयार होतो.
३. गाजराचे पातळ काप करायचे. कांद्याची पातही बारीक चिरायची. एका खोलगट पातेल्यात धुतलेला कोबी घ्यायचा. त्यात गाजर घालायचे. कांद्याची पात घालायची. त्यात तयार केलेला सॉस ओतायचा. वरतून पांढरे तीळ घालायचे आणि ढवळून घ्यायचे. हवाबंद डब्यात साठवून ठेवायचे.
Web Summary : Kimchi, a fermented Korean staple, blends cabbage, garlic, ginger, and chili. Rich in probiotics and antioxidants, it's versatile, enjoyed with rice, soups, and noodles. This recipe makes it easy to prepare at home.
Web Summary : किमची, एक किण्वित कोरियन व्यंजन, पत्ता गोभी, लहसुन, अदरक और मिर्च का मिश्रण है। प्रोबायोटिक्स और एंटीऑक्सीडेंट से भरपूर, यह बहुमुखी है, और इसे चावल, सूप और नूडल्स के साथ आनंद लिया जाता है। यह रेसिपी इसे घर पर बनाना आसान बनाती है।