lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > साधा चहा करण्यासाठी बघा किती कुटाणे केले! तुम्ही पाहिली का चहा करण्याची ही सगळ्यात अवघड रेसिपी

साधा चहा करण्यासाठी बघा किती कुटाणे केले! तुम्ही पाहिली का चहा करण्याची ही सगळ्यात अवघड रेसिपी

Viral Video Of Making Tea: साधा एक कप तर चहा करायचाय... पण त्यासाठी बघा किती कुटाणे केले.. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे... (Netizens stunned after watching this viral video of making tea)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2023 03:44 PM2023-11-28T15:44:30+5:302023-11-28T15:45:15+5:30

Viral Video Of Making Tea: साधा एक कप तर चहा करायचाय... पण त्यासाठी बघा किती कुटाणे केले.. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे... (Netizens stunned after watching this viral video of making tea)

Viral video of making tea, How to make tea, Netizens stunned after watching this viral video of making tea | साधा चहा करण्यासाठी बघा किती कुटाणे केले! तुम्ही पाहिली का चहा करण्याची ही सगळ्यात अवघड रेसिपी

साधा चहा करण्यासाठी बघा किती कुटाणे केले! तुम्ही पाहिली का चहा करण्याची ही सगळ्यात अवघड रेसिपी

Highlightsबघा आता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच असा गरमागरम चहा करून प्या...

सध्या थंडीचा मौसम आहे. त्यात पाऊसही काही ठिकाणी हजेरी लावतो आहे. अशा या थंडगार वातावरणात चहाप्रेमींना वारंवार चहाची आठवण येते. आता चहा करायचा म्हणजे पाण्यात चहा पावडर, साखर घालायची. असेल तर चहा मसाला टाकायचा. नाहीतर मग किसलेलं आलं, वेलची, गवती चहा टाकायचा. पाण्याला उकळी आली की त्यात दूध टाकायचं. पुन्हा एकदा उकळी आली की गरमागरम चहा तयार... एवढी सोपी ही रेसिपी (Viral video of making tea). याव्यतिरिक्तही चहा करण्याच्या अनेक रेसिपी आहेत. पण सध्या चहा करण्याचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात एवढ्या अवघड पद्धतीने चहा केला आहे की ते सगळे कुटाणे करण्यापेक्षा एखादी व्यक्ती चहा पिणेच सोडून देईल....(Netizens stunned after watching this viral video of making tea)

 

आता त्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार चहा करायचा की नाही हे नंतर ठरवा. पण सहज गंमत म्हणून एकदा तो व्हिडिओ पाहून घ्या. अतिशय मजेशीर व्हिडिओ असून नेटकरी मंडळींनी तर त्याला चक्क चाय- सब्जी असं म्हटलं आहे. रोस्टेड मिल्क टी असं त्या व्हिडिओमध्ये त्या चहाचं वर्णन करण्यात आलं असून काही जणांच्या मते कधीतरी असा चहा प्यायला बरा आहे..  Monica Jasuja या सोशल मिडिया हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा चहा कसा केला ते आता पाहूया... त्यासाठी आपण चहा करताना जे साहित्य वापरतो, तेच साहित्य वापरलेलं आहे.

 

सगळ्यात आधी तर एक नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवला आणि त्यात चहा पावडर आणि साखर टाकून ती चांगली भाजून घेतली. हळूहळू साखरेचा पाक झाला. त्यानंतर त्यात वेलची आणि आलं टाकलं. पुन्हा एकदा सगळं मिश्रण एकजीव करून भाजून घेतलं. यानंतर त्यामध्ये थाेडं पाणी घातलं. पाण्याला उकळी आली की त्यात दूध टाकलं. सगळं मिश्रण हलवून घेतल्यावर पॅनवर झाकण ठेवून दिलं. पुन्हा उकळी येऊ दिली आणि त्यानंतर चहा गाळून घेतला. बघा आता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच असा गरमागरम चहा करून प्या...

 

Web Title: Viral video of making tea, How to make tea, Netizens stunned after watching this viral video of making tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.