Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ना भाजायची गरज ना परतायची, विदर्भ स्टाइल कच्चा चिवडा म्हणजे झटपट सोपी रेसिपी, नाश्त्यासाठी खास

ना भाजायची गरज ना परतायची, विदर्भ स्टाइल कच्चा चिवडा म्हणजे झटपट सोपी रेसिपी, नाश्त्यासाठी खास

Vidarbha style raw chivda is a quick and easy recipe, perfect for breakfast, must try : चविष्ट विदर्भ स्टाइल चिवडा रेसिपी. पटकन करा चटकन खा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2026 16:31 IST2026-03-30T16:29:20+5:302026-03-30T16:31:28+5:30

Vidarbha style raw chivda is a quick and easy recipe, perfect for breakfast, must try : चविष्ट विदर्भ स्टाइल चिवडा रेसिपी. पटकन करा चटकन खा.

Vidarbha style raw chivda is a quick and easy recipe, perfect for breakfast, must try | ना भाजायची गरज ना परतायची, विदर्भ स्टाइल कच्चा चिवडा म्हणजे झटपट सोपी रेसिपी, नाश्त्यासाठी खास

ना भाजायची गरज ना परतायची, विदर्भ स्टाइल कच्चा चिवडा म्हणजे झटपट सोपी रेसिपी, नाश्त्यासाठी खास

संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खायची इच्छा सगळ्यांनाच होते. पण मग काही परतायची, भाजायची आणि तळायची गरज असेल तर कंटाळाही तेवढाच येतो. मात्र काही रेसिपी असतात ज्या वेळही वाचवतात आणि इंधनही. करायला सोप्या असतात आणि लगेच होतात. त्यापैकीच एक म्हणजे विदर्भ स्टाइल कच्चा चिवडा. ( Vidarbha style raw chivda is a quick and easy recipe, perfect for breakfast, must try )चिवडा करण्यासाठी पोहे भाजणं सगळ्यात महत्वाचं असतं मात्र या रेसिपीसाठी कच्चे पोहेच वापरले जातात. पाहा सोपी आणि चविष्ट रेसिपी. 

साहित्य
पोहे, चुरमुरे, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, तेल, लिंबू, शेंगदाणे, तळलेली बॉबी, पापड, लाल तिखट, मीठ, डाळं, चणे, हळद , टोमॅटो

कृती
१. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची. स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची. तसेच हिरवी मिरचीही बारीक चिरायची. टोमॅटोही छान बारीक चिरायचा. प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठरवा. 

२. एका परातीत पोहे घ्यायचे, त्यात चुरमुरे घालायचे. तसेच शेंगदाणेही घालायचे. तळलेली बॉबी म्हणजेच पिवळ्या नळ्या बाजारात मिळतात, त्या हाताने चुरायच्या आणि परातीत घालायच्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. चुरलेला पापड घालायचा. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. डाळं घालायचं चणे घालायचे. सगळं मस्त मिक्स करायचं. 

३. त्यात थोडा लिंबू पिळायचा. चमचाभर लाल तिखट घालायचे अगदी थोडी हळद घालायची. चवीनुसार मीठ घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची दोन चमचे कच्चं तेल घालायचं आणि हातानेच सगळं मस्त मिक्स करायचं. तयार केल्यावर लगेच खायचं. म्हणजे ते मऊ पडत नाही. एकदा नक्की करुन पाहा.     

Web Title : विदर्भ स्टाइल कच्चा चिवड़ा: झटपट, आसान, बिना पके नाश्ता।

Web Summary : मसालेदार नाश्ता खाने का मन है? विदर्भ का कच्चा चिवड़ा आजमाएं! यह बिना पके रेसिपी है, जिसमें कच्चे पोहे को मूंगफली, मसालों और कुरकुरे तत्वों जैसे तली हुई नूडल्स और पापड़ के साथ मिलाया जाता है। प्याज, टमाटर और धनिया डालें। अच्छी तरह मिलाएं, नींबू डालें और तुरंत आनंद लें।

Web Title : Vidarbha-style raw chivda: Quick, easy, no-cook snack recipe.

Web Summary : Craving a spicy snack? Try Vidarbha's raw chivda! This no-cook recipe uses raw poha, mixed with peanuts, spices, and crunchy elements like fried noodles and papad. Add onion, tomato, and cilantro. Mix well, add lemon, and enjoy immediately.