Lokmat Sakhi >Food > वडापाव स्पेशल झणझणीत पिवळी चुरा चटणी, टपरीवरच्या चटणीपेक्षाही भारी आता करा घरी!

वडापाव स्पेशल झणझणीत पिवळी चुरा चटणी, टपरीवरच्या चटणीपेक्षाही भारी आता करा घरी!

Vada Pav Special spicy yellow chutney, homemade food, easy recipe, try it for sure : वडापावसोबतची चटणीही तेवढीच महत्वाची. खा मस्त चमचमीत चटणी. एकदा करुन तर पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2025 17:14 IST2025-07-08T17:13:24+5:302025-07-08T17:14:35+5:30

Vada Pav Special spicy yellow chutney, homemade food, easy recipe, try it for sure : वडापावसोबतची चटणीही तेवढीच महत्वाची. खा मस्त चमचमीत चटणी. एकदा करुन तर पाहा.

Vada Pav Special spicy yellow chutney, homemade food, easy recipe, try it for sure | वडापाव स्पेशल झणझणीत पिवळी चुरा चटणी, टपरीवरच्या चटणीपेक्षाही भारी आता करा घरी!

वडापाव स्पेशल झणझणीत पिवळी चुरा चटणी, टपरीवरच्या चटणीपेक्षाही भारी आता करा घरी!

वडापाव म्हणजे मराठी लोकांच्या मनावर राज्य करणारा पदार्थ. हा मराठमोळा पदार्थ घरोघरी केला जातो आणि प्रचंड आवडीने खाल्लाही जातो. मात्र वडापाव नुसता नाही तर त्यासोबत इतरही काही पदार्थ असतील तर त्याची मज्जा आहे. (Vada Pav Special spicy yellow chutney, homemade food, easy recipe, try it for sure)जसे की तललेली हिरवी मिरची. मस्त मीठ लावलेली ही मिरची असलीच पाहिजेच. तसेच लसणीची चटणी आणि दाण्यांची चटणीही खाल्ली जाते. वडापावासोबत ओली चटणी खाल्ली जाते ती कोथिंबीर पुदिन्याची. मात्र एक अशीही चटणी आहे जी फार आवडीने घरोघरी खाल्ली जाते. रंगाने पिवळी असलेली ही चटणी करायला अगदीच सोपी आहे. एकदा वडापावासोबत खाऊन तर पाहा. मज्जाच येईल.  

फक्त वडापावच नाही तर डोसा, अप्पम, उतप्पा आणि इडली सारख्या पदार्थांसोबतही ही चटणी छान लागते. करायला मोजून दहा मिनिटे लागतात. भरपूर शेंगदाणे वापरायला मात्र अजिबात विसरु नका. दाण्याची चव चटणीला चार चांद लावते. पाहा ही चटणी करायची पद्धत. 


साहित्य 
बेसन, तेल, शेंगदाणे, सुकं खोबरं, लसूण, मीठ, पाणी, हळद 

कृती
१. बेसन एका वाटीत घ्या. त्यात पाणी घाला आणि मीठ घाला. त्याची पेस्ट तयार करा. कढईत तेल तापवा आणि गरम तेलात बेसनाचे पीठ सोडून चुरा तयार करुन घ्या. वडापावसोबतची चटणी या चुऱ्यामुळेच जास्त छान लागते.  भरपूर नाही थोडाच चुरा घ्यायचा. 

२. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. भाजून झाल्यावर दाण्यांची सालं काढून घ्यायची. त्याच कढईत सुकं खोबरं भाजायचं. मस्त खमंग भाजल्यावर गार करत ठेवायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. एका मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. तसेच त्यात भाजलेले दाणे घालायचे आणि भाजलेले सुके खोबरेही घालायचे. 

३. मिक्सरच्या भांड्यात थोडे मीठ आणि हळदही घालायची. तसेच त्यात तळलेला चुरा घालायचा आणि मग पाणी घालायचे. सगळं मस्त वाटून घ्यायचं. चटणी एकदम छान वाटली गेली पाहिजे जास्त पातळ नको. जरा घट्टच ठेवा. 

Web Title: Vada Pav Special spicy yellow chutney, homemade food, easy recipe, try it for sure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.