आजकाल कोणतीही आनंदाची गोष्ट असली तरी केक कापूनच ती सेलिब्रेट केली जाते. त्यामुळे वाढदिवसालाही केक पाहिजेच. केक न कापता वाढदिवसाचं सेलिब्रेशन कित्येकांना अधुरं वाटतं. म्हणूनच जर तुमच्या घरातल्या एखाद्या सदस्याचा वाढदिवस आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2025) आला असेल तर आता केकचं कसं करावं, असं टेन्शन अजिबात घेऊ नका. पटकन ही रेसिपी पाहा आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्याघरी उपवासाचा केक तयार करा (how to make cake for fast?).. हा केक चवीला तर छान आहेच शिवाय त्यात कोणतेही केमिकल्स नसल्याने आरोग्यासाठीही उत्तम आहे.(upavasacha cake recipe in Marathi)
उपवासाचा केक करण्याची रेसिपी
साहित्य
भगर आणि राजगिऱ्याचे पीठ मिळून १ वाटी
२ कप पिठीसाखर
२ चमचे पातळ केलेले तूप किंवा मग शेंगदाण्याचे तेल
पावसाळ्यात गूळ-फुटाणे खाणं योग्य की पोटाला त्रास? बघा तज्ज्ञ सांगतात, नेमकं खावं कधी..
४ चमचे दही
१ टीस्पून बेकिंग पावडर
अर्धा टीस्पून बेकिंग सोडा
२ टेबल स्पून मिल्क पावडर
अर्धा कप दूध
कृती
एका मोठ्या भांड्यामध्ये तूप किंवा तेल, मिल्क पावडर, दही आणि पिठीसाखर हे पदार्थ घ्या आणि ते व्यवस्थित फेटून एकजीव करून घ्या. त्यात साखरेच्या किंवा मिल्क पावडरच्या गाठी राहू देऊ नका.
यानंतर दुसऱ्या एका भांड्यामध्ये भगरीचं पीठ, राजगिरा पीठ चाळून घ्या. त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला. आता दूध टाकून हे बॅटर तयार करा.
साबुदाणे वडे तळताना फुटून तेल अंगावर उडतं? ३ टिप्स- तेल उडून चटका बसणार नाही
तयार केलेले दोन्ही बॅटर एकत्र करा. एखादं ॲल्युमिनियमचं भांडं घ्या त्याला ग्रिसिंग करून घ्या आणि त्यामध्ये तयार केलेलं बॅटर घाला. आता एक कढई घ्या. त्यामध्ये एखादी वाटी मीठ घाला. त्यावर एखादी वाटी ठेवा आणि झाकण ठेवून कढई १० मिनिटांसाठी मंद आचेवर प्री हिट करून घ्या.
यानंतर बॅटर घातलेलं भांडं कढईमध्ये ठेवा आणि मंद ते मध्यम आचेवर तो बेक करून घ्या. साधारण ४० ते ४५ मिनिटांत केक छान तयार होईल. केक पुर्णपणे थंड झाल्यानंतरच भांड्यातून बाहेर काढावा.