Lokmat Sakhi >Food > भाजलेल्या सिमला मिरचीची चटणी एकदा खाऊन तर बघा, लहानमोठे सगळेच होतील दिवाने

भाजलेल्या सिमला मिरचीची चटणी एकदा खाऊन तर बघा, लहानमोठे सगळेच होतील दिवाने

try this roasted capsicum chutney , easy recipe, tasty and spicy dip : सिमला मिरचीची अशी चटणी लहान मुलांना नक्की आवडेल. पाहा कशी करायची. अगदी कमी सामग्रीत करा मस्त पदार्थ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2025 15:42 IST2025-07-03T15:41:49+5:302025-07-03T15:42:37+5:30

try this roasted capsicum chutney , easy recipe, tasty and spicy dip : सिमला मिरचीची अशी चटणी लहान मुलांना नक्की आवडेल. पाहा कशी करायची. अगदी कमी सामग्रीत करा मस्त पदार्थ.

try this roasted capsicum chutney , easy recipe, tasty and spicy dip. | भाजलेल्या सिमला मिरचीची चटणी एकदा खाऊन तर बघा, लहानमोठे सगळेच होतील दिवाने

भाजलेल्या सिमला मिरचीची चटणी एकदा खाऊन तर बघा, लहानमोठे सगळेच होतील दिवाने

सिमला मिरची लहान मुलांना फार आवडत नाही. मात्र ही अशी एक भाजी आहे वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांमध्ये लपवता येते. लहानच काय मोठ्यांनाही ओळखता येणार नाही की सिमला मिरची खात आहेत. (try this roasted capsicum chutney , easy recipe, tasty and spicy dip.)एकदम साधी आणइ सोपी अशी रेसिपी आहे. करायला मोजून पाच मिनिटे लागतात. लाल सिमला मिरची बाजारात आरामात मिळते. ती घ्या किंवा तुम्हाला जी मिळेल ती वापरा. रोजची साधी हिरवीसुद्धा चालेल. 

 


साहित्य
सिमला मिरची, पनीर, काजू , लसूण, लाल तिखट, साखर, लिंबू, मीठ, ओरेगॅनो, काश्मीरी लाल मिरची 

कृती

१. सिमला मिरची लाल रंगाची घ्यायची. जर लाल मिळाली नाही तर मग हिरवी वापरा. रंग थोडा वेगळा येईल. मात्र चवीला मस्तच लागेल. सिमला मिरची गॅसवर भाजायची. पापड जसा भाजता किंवा भरताचे वांगे जसे भाजले जाते अगदी त्याच पद्धतीने सिमला मिरची भाजून घ्यायची. एका वाटीत पाणी घ्यायचे आणि काश्मीरी लाल मिरची भिजत ठेवायची. त्याच्या बिया आणि देठ आधीच काढून घ्यायचे. त्याच वाटीत किंवा दुसऱ्या वाटीत थोडे काजूही भिजवायचे. 

२. सिमला मिरची बाहेरुन काळी होईपर्यंत परतायची. नंतर काळपट भाग काढायचा आणि आतील बियाही काढून घ्यायचा. सिमला मिरची मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आणि त्यात भिजवलेली काश्मीरी लाल मिरचीही घालायची. भिजवलेले काजू घालायचे लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. त्याही मिक्सरच्या भांड्यात घालायच्या. तसेच चमचाभर लाल तिखट घालायचे. पनीरचे तुकडे घालायचे. पनीर जरा जास्त घ्यायचे. थोडे ओरेगॅनो घाला आणि लिंबाचा थोडा रस पिळा. अगदी चमचाभर साखर घाला आणि दोन चमचे पाणी घाला. लहान चमचाच घ्यायचा. 

३. मिक्सरमधून सगळे पदार्थ मस्त वाटून घ्यायचे. छान घट्ट आणि एकजीव अशी चटणी तयार करायची. त्यातील सगळे पदार्थ नीट वाटले जातील याची काळजी घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर त्यात कांदा, मसाले, चीज , ब्रोकोली असे इतरही पदार्थ घालू शकता. मात्र ही अशी चटणी करणे एकदम सोपे आहे. एकदा नक्कीच करुन पाहा. तळणीचे पदार्थ असतील किंवा पिझ्झा पास्ता असेल अशा पदार्थांशी एकदम मस्त लागेल.    


Web Title: try this roasted capsicum chutney , easy recipe, tasty and spicy dip.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.