Lokmat Sakhi >Food > एकदा नक्की करा ताकातला बटाटा, सगळेच विचारतील आज काय स्पेशल !!

एकदा नक्की करा ताकातला बटाटा, सगळेच विचारतील आज काय स्पेशल !!

try Matthe Wale Aloo once, everyone will ask what's special today!! tasty potato recipe : ताकातील बटाट्याची अशी भाजी नक्कीच कधी खाल्ली नसेल. पाहा किती सोपी रेसिपी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2025 15:14 IST2025-06-21T15:12:32+5:302025-06-21T15:14:07+5:30

try Matthe Wale Aloo once, everyone will ask what's special today!! tasty potato recipe : ताकातील बटाट्याची अशी भाजी नक्कीच कधी खाल्ली नसेल. पाहा किती सोपी रेसिपी आहे.

try Matthe Wale Aloo once, everyone will ask what's special today!! tasty potato recipe | एकदा नक्की करा ताकातला बटाटा, सगळेच विचारतील आज काय स्पेशल !!

एकदा नक्की करा ताकातला बटाटा, सगळेच विचारतील आज काय स्पेशल !!

काही वेगळा पदार्थ असेल तर तो एकदा करुन नक्की पाहावा. कदाचित आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मस्त असू शकतो. असाच भन्नाट पदार्थ म्हणजे ताकातला बटाटा. (try Matthe Wale Aloo once, everyone will ask what's special today!! tasty potato recipe )हा पदार्थ मठ्ठेवाले आलू या नावाने प्रसिद्ध आहे. करायला अगदीच सोपा आहे मात्र चव एकदम जबराट. पाहा सिंपल रेसिपी.   

साहित्य 
काश्मीरी लाल मिरची, बटाटा, पाणी, मीठ, कोथिंबीर, हळद, मोहरी, जिरे, हिंग, हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाला, आलं  

कृती
१. मध्यम आकाराचे बटाटे छान उकडून घ्यायचे. अति शिजवायचे नाहीत. मध्यम शिजवायचे. नंतर हाताने कुसकरता येतील एवढेच शिजवा. एका पातेल्यात कोमट पाणी घ्यायचे. त्यात बटाटा कुसकरायचा. पाणी जास्त घ्यायचे नाही. बटाटे ओले राहतील एवढेच पाणी घ्यायचे. 

२. एका कढईत दोन चमचे तेल घ्यायचे. तेलात थोडे जिरे घालायचे. जिरे फुलू द्यायचे मग त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की मग त्यात हिंग घालायचे. हिंग घालायला विसरु नका. बटाटा वातूळ असतो. पण हिंगामुळे बाधत नाही. हिंग घातल्यावर त्यात बारीक किसलेलं आलं घालायचं. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालायचे. सगळं मस्त परतून घ्यायचे. त्यात काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे घालायचे.  

३. एका वाटीत चमचाभर लाल तिखट घ्यायचे. चमचाभर हळद घ्यायची. चमचाभर गरम मसालाही घ्यायचा. गरज असेल तर मीठ घ्यायचे. त्यात दोन चमचे पाणी घालायचे आणि पेस्ट तयार करायची. त्यात गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित ढवळायचे. नंतर तयार फोडणीमध्ये ती पेस्ट ओतायची आणि छान परतायची. मसाले जरा शिजू द्यायचे. मसाले शिजल्यावर पाण्यात भिजवलेले बटाटे त्यात घालायचे आणि ढवळायचे. वरतून दोन वाटी ताक ओतायचे. ताक ताजे गोड घ्या. ढवळा आणि मग झाकून एक वाफ काढा. ताक उकळल्यावर जरा घट्ट होईल. घट्ट झाल्यावर त्यात छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. जरा शिजू द्यायचे. मग गॅस बंद करा. वरुन लाल तिखटाची फोडणी देऊ शकता. नाही दिली तरी हरकत नाही.     
 

Web Title: try Matthe Wale Aloo once, everyone will ask what's special today!! tasty potato recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.