उरलेल्या चपातीचा लाडू ही आपल्या आजी-आजोबांच्या काळातील एक पारंपरिक आणि मस्त रेसिपी आहे. जुन्या काळी अन्न वाया जाणे अजिबात चालायचे नाही. त्यामुळे घरात उरलेल्या चपात्या वाया न घालवता त्यांचा उपयोग चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करण्यासाठी केला जायचा. अशाच कल्पकतेतून हा लाडू तयार झाला. (Try making laddu from leftover chapatis, try this unique recipe this time)या लाडूमध्ये तुपाचा सुवास, गुळाची गोडी आणि भाजलेल्या चपातीचा खास स्वाद एकत्र येऊन एक अप्रतिम चव तयार होते.
उरलेल्या चपातींचा हा उपयोग केवळ चविष्ट नाही, तर पौष्टिकही आहे. यात कार्बोहायड्रेट, लोह आणि गुळातील नैसर्गिक गोडपणा मिसळून शरीराला ऊर्जा मिळते. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी हा हलका पण तृप्त करणारा पदार्थ आहे. मुलांना गोड आवडत असल्याने त्यांच्यासाठीही हा एक उत्तम पर्याय ठरतो. त्यामुळे हा पदार्थ नक्की करुन पाहा. पोळीचा लाडू करायची ही पद्धत जरा वेगळी आहे.
साहित्य
पोळी, तूप, काजू, बदाम, गूळ
कृती
१. उरलेली पोळ घ्यायची. त्याला थोडे तूप लावायचे. तव्यावर पोळी परतून घ्यायची. छान खमंग परतायची. कुरकुरीत करायची. परतून झाल्यावर जास्त गार न करता कोमट झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायची. एकदम गार झाल्यावर ती कडक होते.
२. मिक्सरच्या भांड्यात थोडा गूळ आणि तुपही घालायचे.पोळीचा लाडू करण्यासाठी जेवढे वाटायची गरज आहे तेवढेच वाटा. अगदी लगदा केला तर त्याला आकार देता येत नाही. तसेच तुपही अगदी प्रमाणात घ्यायचे म्हणजे लाडू छान होतो. मिक्सरमधून लाडूचे सारण वाटून घेतल्यावर ते एका खोलगट भांड्यात काढून घ्यायचे.
३. काजू आणि बदामाचे तुकडे करायचे. ते तुकडेही लाडूच्या सारणात घालायचे. मिक्स करायचे आणि नंतर लाडू वळून घ्यायचे. छान गोलाकार असे लाडू वळले जातात. असा केलेला लाडू चवीला जरा वेगळा लागतो. नक्की करुन पाहा.