Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > डाळ शिजवण्या-घोटण्यापासून फोडणी देण्यापर्यंतच्या ५ टिप्स- ढाबास्टाइल दालतडका करा १५ मिनिटांत

डाळ शिजवण्या-घोटण्यापासून फोडणी देण्यापर्यंतच्या ५ टिप्स- ढाबास्टाइल दालतडका करा १५ मिनिटांत

Tips To Make Perfect Dal At Home (Hotel Style Dal Recipe) : जेव्हा तेल व्यवस्थित गरम होईल तेव्हाच जीरं घाला  आणि व्यवस्थित तडतडू द्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:57 IST2026-01-21T14:54:35+5:302026-01-21T14:57:30+5:30

Tips To Make Perfect Dal At Home (Hotel Style Dal Recipe) : जेव्हा तेल व्यवस्थित गरम होईल तेव्हाच जीरं घाला  आणि व्यवस्थित तडतडू द्या.

Tips To Make Perfect Dal At Home : How To Make Dal Tadka in 15 Minutes | डाळ शिजवण्या-घोटण्यापासून फोडणी देण्यापर्यंतच्या ५ टिप्स- ढाबास्टाइल दालतडका करा १५ मिनिटांत

डाळ शिजवण्या-घोटण्यापासून फोडणी देण्यापर्यंतच्या ५ टिप्स- ढाबास्टाइल दालतडका करा १५ मिनिटांत

प्रत्येक घरामध्ये वरण बनवलं जातं. भातासोबत किंवा चपातीसोबत खायला बरेचजण वरणाचा आहारात समावेश कऱतात. काही घरांमध्ये चव खास नसल्यामुळे लोक वरण  खाणं टाळतात. उत्तम वरण करण्यासाठी तुम्ही डाळ कोणती वापरता त्यासोबतच वरणाला फोडणी कशी देतात. (How To Make Dal Tadka At Home) फोडणीत काय काय वापरता हे सुद्धा महत्वाचं असतं. फोडणीसाठी मसाले घालण्याचा योग्य क्रम आणि आच कशी ठेवता हे खूपच महत्वाचे असते (Hotel Style Dal Recipe). चवदार चविष्ट डाळ करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स पाहूया. (Tips To Make Perfect Dal At Home)

योग्य तूप किंवा तेलाची निवड

फोडणी देण्यासाठी तूप महत्वाचे मानले जाते. ज्यामुळे डाळ घट्ट आणि सुगंधित होते. तुम्हाला फार सुगंध नको असेल तर तुम्ही मोहोरी किंवा शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करू शकता. तूप किंवा तेल व्यवस्थित गरम करून घ्या. तरच मसाले व्यवस्थित फ्राय होतील. (Dal Tadka Making Tips)

जीरं घालण्याची योग्य वेळ

जेव्हा तेल व्यवस्थित गरम होईल तेव्हाच जीरं घाला  आणि व्यवस्थित तडतडू द्या. यादरम्यान गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. जीरं तडतडल्यानंतर १ चुटकी हिंग घाला. हिंग जास्त घालू नका अन्यथा वरण कडवट लागू शकतं.

गाडीवर मिळतो तसा बटाटा वडा घरीच करा; बटाट्याच्या भाजीची खास रेसिपी, परफेक्ट होईल वडा

लसूण आणि आलं

नंतर एक एक करून लसूण आणि आलं घाला आणि मंद आचेवर  गोल्डन होईपर्यंत तळून घ्या. लसणानंतर त्यात सुकी लाल मिरची घाला. मिरची चिरण्याऐवजी तोडून घातल्यानं त्याची चव आणि सुगंध चांगला येतो. डाळीला चांगली चव येण्यासाठी डाळ शिजवतानाच त्यात टोमॅटो चिरून घाला.

मसाले घालण्याची योग्य पद्धत

फोडणीत कांदा घालून गोल्डन होईपर्यंत तळून घ्या. जास्त पांढरा झाल्यामुळेत्याची चव खराब होऊ शकते.नंतर यात हळद, लाल मिरची पावडर किंवा धणे पावडर यांसारखे मसाले घाला. नंतर गॅस बंद करा किंवा लगेच तडका डाळीत घाला.जेणेकरून मसाले जळणार नाहीत. तयार फोडणी घोटलेल्या डाळीत घाला.

खिडक्यांच्या स्लायडींगमध्ये खूपच घाण अडकली? ७ ट्रि्क्स, खिडकीचा ट्रॅक चकाचक, स्वच्छ होईल

कसुरी मेथी

तुम्ही वरणाला नवा ट्विस्ट देण्यासाठी त्यात थोडी कसूरी मेथी चुरून घालू शकता. नंतर लगेच त्यावर झाकण ठेवा. ज्यामुळे फोडणीचा सुगंध  वरणात उतरेल आणि चव दुप्पटीनं वाढेल.

Web Title : दाल तड़का: 15 मिनट में ढाबा-शैली दाल के लिए 5 टिप्स।

Web Summary : घर पर स्वादिष्ट दाल तड़का बनाएं। सही घी या तेल चुनना और जीरा, लहसुन और मसालों जैसी सामग्री को सही क्रम में डालना महत्वपूर्ण है। कसूरी मेथी एक अनोखा स्वाद जोड़ती है।

Web Title : Dal Tadka: 5 tips for dhaba-style dal in 15 minutes.

Web Summary : Make flavorful dal tadka at home. Key is choosing the right ghee or oil and adding ingredients like cumin, garlic, and spices in the right order. Kasuri methi adds a unique twist.