lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > एका मिनिटांत २० चपात्या! पाहा कुकरमध्ये चपात्या करण्याची भन्नाट ट्रिक - भरपूर वेळ वाचेल

एका मिनिटांत २० चपात्या! पाहा कुकरमध्ये चपात्या करण्याची भन्नाट ट्रिक - भरपूर वेळ वाचेल

Tips And Tricks How to Make Chapati in Pressure Cooker : चपाती बनवणं म्हणजे कंटाळवाणं काम. रोज चपात्या बनवणं कोणालाच आवडत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:23 PM2024-04-12T12:23:45+5:302024-04-12T14:30:55+5:30

Tips And Tricks How to Make Chapati in Pressure Cooker : चपाती बनवणं म्हणजे कंटाळवाणं काम. रोज चपात्या बनवणं कोणालाच आवडत नाही

Tips And Tricks How to Make Chapati in Pressure Cooker : Chapati Making Hacks How To Make Chapati At Home | एका मिनिटांत २० चपात्या! पाहा कुकरमध्ये चपात्या करण्याची भन्नाट ट्रिक - भरपूर वेळ वाचेल

एका मिनिटांत २० चपात्या! पाहा कुकरमध्ये चपात्या करण्याची भन्नाट ट्रिक - भरपूर वेळ वाचेल

प्रत्येक घरांमध्ये रोजच्या जेवणासाठी डाळ, भाजी, भाकरी, चपाती असा पूर्ण स्वंयपाक बनवला जातो. (Kitchen Hacks) पोट भरण्याबरोबरच चांगल्या आरोग्यासाठीही भाकरी, चपाती खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं. चपात्यांचा रोजच्या आहारात समावेश करायला हवा. चपाती बनवणं म्हणजे कंटाळवाणं काम. रोज चपात्या बनवणं कोणालाच आवडत नाही. (Cooking Hacks & Tips) 

खासकरून  उन्हाळ्याच्या दिवसांत किचनमध्ये तासनतास  उभं राहून शेकणं कठीण वाटतं. अशा स्थितीत  काही सोपे उपाय करून तुम्ही चपात्या करण्याचे किचकट काम सोपं  करू शकता.  सोशल मीडियावरही चपाती करण्याची पद्धत व्हायरल होत आहे. प्रेशर कुकरच्या मदीने तव्यावर चपात्या शेकू शकता. (Tips And Tricks How to Make Chapati in Pressure Cooker)

प्रेशर कुकरमध्ये या पद्धतीने करा चपाती

१) सगळ्यात आधी गव्हाचे पीठ आणि पाणी मिसळून एक सॉफ्ट कणीक मळून घ्या आणि काही वेळासाठी तसंच झाकून ठेवा.  छोटे छोटे लिंबाइतके गोळे तयार करून लाटून घ्या.

२)  लाटलेल्या कच्च्या चपात्या एका प्लेटवर ठेवा. चपात्या  एकमेकांना चिटकणार नाही याची काळजी घ्या नंतर त्याला  सुकं पीठ लावून लाटून घ्या. ८ ते १० चपात्या तयार झाल्यानंतर एका बाजूला ठेवा. 

3) एका मोठ्या आकाराच प्रेशर कुकर घ्या त्यात  एक वाटी मीठ घाला. त्यानंतर मीठ एक मध्य आकाराची वाटी घ्या. याऐवजी तुम्ही चपटा स्टिलचा डब्बा घ्या.

व्हिटामीन-D हवंय पण ऊन्हात जायला आवडत नाही? १ उपाय करा, कमकुवत हाडांना येईल ताकद

४) जेव्हा प्रेशर कुकर गरम होईल तेव्हा सर्व चपात्या उलट्या वाटीवर ठेवा. प्रेशर कुकरचं झाकण बंद करा. शिट्टी लागलेली नसेल याची काळजी घ्या. शिट्टी लावून ठेवणं धोकादायक ठरू शकतं. 

६२ व्या वर्षी तरूण-हॉट दिसणारा सुनिल शेट्टी खातो तरी काय? पाहा साधं-सोपं फिटनेस रूटीन

५)  या पद्धतीने ३ ते ४ मिनिटांत  चपात्या तयार होईल.  नंतर प्रेशर कुकर गॅसवरून खाली उतरवून घ्या आणि हळूहळू  झाकण उघडा. चिमट्याच्या मदतीने चपात्या काढून गरमागरम सर्व्ह करा. चपाती करताना  याची पुरेपूर काळजी घ्या.

 अलिकडेच कुकरमध्ये चपाती करण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात एक महिला चपात्या शेकत होती. चपात्या करण्याची ही ट्रिक खूप व्हायरल होत आहे.काही लोक  चपाती करण्यासाठी तासनतास लावतात. उभं राहून चपात्या करण्यात लोक वैतागतात. इतकंच नाही तर बॅचलर्स लोक चपाती करण्यात बराचवेळ घालावतात. तुम्हालाही चपाती बनवण्यास अडचणी येत असतीर तर तुम्ही घरच्याघरी  या ट्रिक्सने चपात्या करू शकता. गोल-गोल चपात्या लगचेच तयार होतील. 
 

Web Title: Tips And Tricks How to Make Chapati in Pressure Cooker : Chapati Making Hacks How To Make Chapati At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.