Lokmat Sakhi >Food > काकडी विकत घेताना कडू आहे की नाही कसं ओळखाल? १ सोपी ट्रिक; तोंड कडू होणार नाही,

काकडी विकत घेताना कडू आहे की नाही कसं ओळखाल? १ सोपी ट्रिक; तोंड कडू होणार नाही,

Tips And Tricks Easy Ways To Identify : बाजारात मिळणाऱ्या काकड्या चांगल्या आहेत की नाही हे ओळण्यासाठी तुम्ही सोपी ट्रिक ट्राय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 07:53 PM2024-05-23T19:53:10+5:302024-05-23T20:10:30+5:30

Tips And Tricks Easy Ways To Identify : बाजारात मिळणाऱ्या काकड्या चांगल्या आहेत की नाही हे ओळण्यासाठी तुम्ही सोपी ट्रिक ट्राय करू शकता.

Tips And Tricks Easy Ways To Identify : Tips And Tricks Easy Ways To Identify Sweet And Desi Cucumber | काकडी विकत घेताना कडू आहे की नाही कसं ओळखाल? १ सोपी ट्रिक; तोंड कडू होणार नाही,

काकडी विकत घेताना कडू आहे की नाही कसं ओळखाल? १ सोपी ट्रिक; तोंड कडू होणार नाही,

ऊन्हाळ्याच्या दिवसांत सर्वच ठिकाणी दुकानात काकड्या  मिळतात. सध्या काकड्यांची मागणीसुद्धा वाढली आहे. काकडी ऊन्हाळ्याच्या दिवसात सर्वचजण खातात. (Food Hacks & Tips) पण जर ताटात वाढलेली काकडी कडू असेल तर तोंडाची चव बिघडते. बाजारात मिळणाऱ्या काकड्या चांगल्या आहेत की नाही हे ओळण्यासाठी तुम्ही सोपी ट्रिक ट्राय करू शकता.  (Tips And Tricks Easy Ways To Identify Sweet And Desi Cucumber)

आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की बाजारात  ३ ते ४ प्रकराच्या काकड्या मिळतात. अशा स्थिती काकडी विकत घेताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कडू काकडीची निवड करू नये. जी काकडी जास्त दाणेदार आणि पातळ नसेल अशी काकडी विकत घ्या. काकडी जितकी गोड असते तितकीच ती चवीसाठीही उत्तम ठरते. 

केस पातळ होत आहेत? जावेद हबीब सांगतात, किचनमधला 'हा' पदार्थ लावा, १५ दिवसांत दाट होतील केस

बाजारात काकडी विकत घेण्यासाठी जात असाल तर अशी दुकानाची निवड करा जिथे दाणेदार काकड्या मिळतात. ग्रामीण भागात उगवली जाणारी काकडी  गोड असते. जी फार कडू लागत नाही. जर काकडी कडू किंवा जास्त पातळ नसेल याची काळजी घ्या. काकडीच्या सालीचा रंग हलका गडद असावा. ज्यामुळे चव चांगली  लागते.

बाजारातून काकडी घेताना जास्त छोट्या साईजची घेऊ नका नेहमी मीडियम साईजची काकडी घ्या.  जास्त मोठ्या आकाराची काकडी निवडू नका कारण यात बीया जास्त असतात. काकडीच्या बीया जास्त पातळ  असतील किंवा आतून  गळलेली, सडलेली असेल तर अशी काकडी खाऊ नका. 

बाजारात मिळणाऱ्या काही काकड्या हिरव्या असतात जे आरोग्यासाठी उत्तम नसतात. नेहमी मीडियम आकाराच्या काकड्यांची निवड करा. जास्त मोठ्या काकड्या घेऊ नका. कारण यात बीया जास्त असतात.
 काकडी विकत घेताना एकदा दाबून पाहा जास्त मऊ असेल तर समजून जा की आतल्या बीया खराब झाल्या आहेत. कडक काकड्यांची निवड करा.  काकडी पांढरी नसेल तर ती चवीला कडवट असू शकते. काकडीत पांढरे डाग नसतील  याची काळजी घ्या. 

Web Title: Tips And Tricks Easy Ways To Identify : Tips And Tricks Easy Ways To Identify Sweet And Desi Cucumber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.