फळं ही निसर्गाची अद्भुत देणगी आहे असं म्हटलं तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण आरोग्याच्या दृष्टीने फळं अत्यंत फायदेशीर ठरतात. पण फळं खावीत की ज्यूस प्यावा असा प्रश्न अनेकांना पडतो. यावरून काही जण कन्फ्यूजही असतात. फळं की ज्यूस... कशामुळे शरीराला जास्त फायदा होतो? आरोग्याच्या दृष्टीने जास्त उपयुक्त काय याबाबत जाणून घेऊया... डाएटीशियन आयुषी यादव यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
फळांचे फायदे
फळामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर सारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात, ज्यामुळे पचन सुधारतं, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. सफरचंदात फायबर असतं, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखं वाटतं. फळ खाताना आपण जेव्हा ते चावतो तेव्हा मेंदूला सिग्नल मिळतो. पोट भरल्याचंही जाणवतं. जांभूळ, संत्र किंवा केळी या फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. अँटीऑक्सिडंट्ससोबत इम्यूनिटी ही बूस्ट होते.
ज्यूसचा आरोग्यावर होणारा परिणाम
ताज्या फळांचा ज्यूस पिण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यात वेगळी साखर घालावी लागत नाही. व्हिटॅमिन सी सारखे न्यूट्रिएंट्स आणि हायड्रेशनसारखे पोषक घटक लवकर मिळवण्याचा हा एक जलद मार्ग आहे. हे जास्त सोयीस्कर आहेत कारण ते बाटलीतून सहजपणे घेऊन जाऊ शकता येतं. फळं चावून खाण्याचा त्रासही वाचतो. फळांचा ज्यूस पिण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे नॅचरल शुगर लवकर एब्जॉर्ब केली जाऊ शकते, अशा परिस्थितीत ब्लड शुगरचं प्रमाण वाढण्याचा धोका असतो, जो विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला नाही. याचाच अर्थ असा की घाईघाईत तुम्ही जास्त कॅलरीज इनटेक करता.
जास्त चांगलं काय?
फळं खाणं की ज्यूस पिणं... तुमच्यासाठी नेमकं काय चांगलं आहे हे तुमच्या सध्याच्या गरजांवर अवलंबून आहे. जर तुम्ही एकूण आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर फळं खाणं हे अधिक चांगलं आहे. त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्व मिळतील. जर तुम्हाला फळांचा ज्यूस प्यायचा असेल तर घरी ताज्या फळांचा ज्यूस करा आणि फक्त एक छोटा ग्लास प्या. जास्त पिऊ नका.
स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही अशा दुकानांमधून ज्यूस पिऊ नका, अन्यथा तुमचं फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. फायबरयुक्त पदार्थ खाताना ज्यूस पिणं चांगलं, यामुळे पोषक तत्वांचे संतुलन राखण्यास मदत होईल. अनेक आजारांमध्ये अन्न खाणं कठीण होतं, तेव्हा फळांचा ज्यूस उपयुक्त ठरतो.