महाराष्ट्रात मिसळ, कटवडा, तार्री पोहे, वडापाव किंवा भाकरीसोबत मिळणारा एक लालसर, सुगंधी आणि तिखटसर पदार्थ म्हणजे तर्री. ज्याला कट, रस्सा अशी विविध नावे आहेत. हा फक्त एक साईड पदार्थ नसून इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कुठल्याही मिसळपावच्या ताटात तर्री नसली तर तो पदार्थ अपूर्ण वाटतो, एवढी त्याची चव आणि लोकप्रियता खोलवर रुजलेली आहे. खाताना ठसका लागतो, डोळ्यातून पाणी येते तरी लोकं आवडीने खातात. (The mouth watering dish, traditional spicy tarri recipe,make it in in ten minutes.)फक्त मिसळच नाही कोणत्याही भाजीत असा कट घातला तर ती भाजीही मस्त लागते. गावोगावी हा कट रोजच्या जेवणाचा भाग आहे. भातासोबतही मस्तच लागतो. मिसळीची रेसिपी आणि रस्स्याची रेसिपी वेगळी आहे. विकतपेक्षाही मस्त कट घरी करण्यासाठी एकदम सोपी रेसिपी पाहा.
साहित्य
सुकं खोबरं, लसूण, लाल तिखट, पाणी, तेल, मोहरी, आलं, धणे, कांदा, जिरं, कडीपत्ता, हिंग, हळद, गरम मसाला, कोथिंबीर
कृती
१. सुक्या खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. तसेच कांदा सोलून घ्यायचा. कांदा लांब - लांब चिरायचा. कोथिंबीर निवडायची आणि बारीक चिरायची. आल्याचा तुकडा घ्यायचा. सुकं खोबरं भाजून घ्यायचं. कांदाही भाजून घ्यायचा. तसेच लसणाच्या पाकळ्या भाजून घ्यायच्या.
२. एका मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं घ्या. त्यात लसणाच्या पाकळ्या घाला आणि भाजलेला कांदाही घाला. आल्याचा तुकडा घालून चमचाभर जिरे घालायचे. अगदी थोडं पाणी घाला ज्यामुळे वाटण तयार करता येईल. वाटण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची. मध्यम घट्ट करायचे.
३. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यात चमचाभर जिरे घालायचे. तसेच चमचाभर मोहरी घालायची. त्यात कडीपत्त्याची पाने घालायची आणि परतून घ्यायची. चमचाभर लाल तिखट घालायचे हळद घालायची तसेच हिंगही घाला आणि तयार वाटण घालून, मस्त परतून घ्यायचे. थोडे पाणी घालायचे. मसाला छान शिजला की जेवढी तर्र हवी तेवढे पाणी घालायचे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. चमचाभर गरम मसाला घालायचा. मस्त उकळायचे त्याला तवंग येईल. चवीपुरते मीठ घालायचे.
