Join us
Daily Top 2Weekly Top 5

अहो, सांगून खरं वाटणार नाही की ‘हे’ औषध आहे, ‘असा’ हर्बल टी म्हणजे मूड मस्त तब्येत जबरदस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2026 15:18 IST

Tasty and healthy recipe - must try this harbal tea , drink everyday : चविष्ट हर्बल टी नक्की प्या, पाहा रेसिपी.

सकाळची सुरुवात असो किंवा दिवसभराचा थकवा कमी करायचा असो, अनेक जण चहा पिणे पसंत करतात. मात्र रोजच्या दुधाच्या आणि साखरेच्या चहाऐवजी हर्बल टी हा आरोग्यासाठी अधिक चांगला पर्याय मानला जातो. (Tasty and healthy recipe - must try this harbal tea , drink everyday )विविध औषधी वनस्पती, मसाले आणि पानांचा वापर करून बनवलेला हर्बल टी शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो. विशेष म्हणजे यामध्ये कॅफिन नसते त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येत नाही.

हर्बल टी बनवण्यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. त्यात ४ ते ५ तुळशीची पाने, अर्धा इंच ठेचलेले आले, काही पुदिन्याची पाने आणि थोडी दालचिनी घाला. हे मिश्रण ५ ते ७ मिनिटे चांगले उकळू द्या. त्यानंतर गाळून त्यात एक चमचा मध आणि थोडासा लिंबाचा रस घालून गरमागरम प्या. हा चहा चवीला हलका आणि ताजेतवाने करणारा असतो. हर्बल टी पिण्याचे अनेक फायदे आहेत. तुळस, आले आणि दालचिनी यांसारख्या घटकांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. बदलत्या हवामानात सर्दी, खोकला किंवा घशात खवखव होत असेल तर हर्बल टी आराम देऊ शकतो. गरम पेयामुळे घशाला उब मिळते आणि शरीर हलके वाटते.

याशिवाय हर्बल टी पचनक्रिया सुधारण्यासही मदत करतो. जड अन्न खाल्ल्यानंतर पोट फुगणे, अपचन किंवा अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आले आणि पुदिन्यामुळे आराम मिळू शकतो. अनेक लोक वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही हर्बल टी पितात. साखर न घालता घेतलेला हर्बल टी मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतो.

दिवसभराच्या धावपळीनंतर मन शांत करण्यासाठीही हर्बल टी उपयोगी ठरतो. त्याचा सुगंध आणि उबदारपणा शरीराला रिलॅक्स होण्यास मदत करतो. उन्हाळ्यात किंवा थकवा जाणवत असताना हा चहा शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासही मदत करतो. आरोग्याची काळजी घेण्यासाठी हर्बल टी हा एक सोपा आणि नैसर्गिक पर्याय मानला जातो. मात्र कोणत्याही गोष्टीचे अतिप्रमाण टाळणे महत्त्वाचे आहे. दिवसातून एक ते दोन वेळा हर्बल टी घेतल्यास त्याचा चांगला फायदा मिळू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Herbal tea: Great taste, health benefits, and a mood booster!

Web Summary : Herbal tea, a blend of herbs and spices, boosts immunity, aids digestion, and promotes relaxation. It's a caffeine-free, hydrating beverage that supports overall well-being. Enjoy one to two cups daily for optimal health benefits.
टॅग्स :आहार योजनाअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स