Join us

पिझ्झा करण्याची ‘ही’ सोपी झटपट रेसिपी पाहा, मुलांना हवा ना पिझ्झा द्या पोटभर-पौष्टिक आणि चमचमीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2025 16:09 IST

Super Healthy Pizza Recipe: मुलांना पिझ्झा आवडत असेल तर पुढे सांगितलेली सुपरहेल्दी पिझ्झा रेसिपी मुलांना करू देऊ शकता..(how to make atta pizza?)

ठळक मुद्देगॅस मंद आचेवर ठेवा आणि पोळीवर झाकण ठेवा. अगदी १ ते २ मिनिटांत क्रिस्पी पिझ्झा तयार.. 

पिझ्झा हा लहान मुलांच्या अतिशय आवडीचा पदार्थ. अगदी मुलांनाच काय पण घरातल्या ज्येष्ठ मंडळींनाही पिझ्झा खायला खूप आवडतो. पिझ्झा खाल्ल्याने पोटात वेगवेगळ्या भाज्या जातात हे अगदी खरं आहे. पण त्यातली एक मोठी अडचण अशी असते की त्याचा बेस मैद्याचा असतो आणि मैदा पोटासाठी अजिबातच चांगला नाही, हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच आता एक मस्त ट्रिक पाहा आणि गव्हाच्या पिठाचा  पिझ्झा मुलांना करून खाऊ घाला (how to make atta pizza?). हा पिझ्झा करायला अगदी सोपा आहे आणि शिवाय तो खूप झटपट होतो (super healthy pizza recipe). त्यामुळे मुलांना डब्यात देण्यासाठीही तो चांगला आहे.(aata pizza recipe for kids tiffin)

पोळीचा पिझ्झा करण्याची रेसिपी

 

साहित्य 

१ वाटी कणिक

सिमला मिरची, टोमॅटो, कांदा, कॉर्न सगळं मिळून एक वाटी

ओरिगॅनो आणि चिलीफ्लेक्स तुमच्या आवडीनुसार

महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी जितकी खास तितकंच ब्लाऊजही हवं झकास, पैठणीवर शोभते ‘असे’ ब्लाऊज, पाहा सुंदर पॅटर्न

१ टीस्पून मीठ

टाेमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस प्रत्येकी १ चमचा

चीज स्लाईस आणि थोडं क्रश चीज

 

कृती

सगळ्यात आधी मीठ घालून कणिक मळून घ्या. यानंतर कणकेचा एक छोटा गोळा घ्या आणि त्याची पोळी लाटून घ्या.

वजन वाढू नये म्हणून जे टाळता; तेच खाऊन करिनाने 'झीरो फिगर' मिळवली होती! वाचा खास गोष्ट

आता त्यामध्ये चीज स्लाईस ठेवा. ती सगळीकडून दुमडून घ्या आणि पुन्हा त्याची पोळी लाटा. आता या पोळीला काट्या चमच्याने ठिकठिकाणी बारीक छिद्रं करा.

 

यानंतर पोळी तव्यावर टाकून एका बाजुने पुर्णपणे भाजून घ्या आणि दुसऱ्या बाजुने तशीच राहू द्या. आता ती पोळी तव्यावरून खाली घ्या.

गौरी गणपतीसाठी घर आवरायचंय; पण वेळच नाही? ५ टिप्स- अवघ्या काही तासांतच घर होईल चकाचक 

पोळीचा जो भाग भाजला गेलेला आहे, त्यावर टोमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस लावा. त्यावर सगळ्या भाज्या आणि क्रश केलेलं चीज घाला आता ही पोळी तव्यावर भाजायला ठेवा. गॅस मंद आचेवर ठेवा आणि पोळीवर झाकण ठेवा. अगदी १ ते २ मिनिटांत क्रिस्पी पिझ्झा तयार..  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.लहान मुलंशाळा