Lokmat Sakhi >Food > १ किलो बटाटे वापरून घरीच करा कुरकुरीत वेफर्स; ३ वर्ष खराब होणार नाहीत, पाहा सोपी रेसिपी

१ किलो बटाटे वापरून घरीच करा कुरकुरीत वेफर्स; ३ वर्ष खराब होणार नाहीत, पाहा सोपी रेसिपी

Sun Dried Homemade Potato Chips : अर्धवट उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि वेफर्समधलं पाणी काढून घ्या. एका साडीवर हे वेफर्स सुकवायला ठेवा.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 11:38 AM2023-03-11T11:38:28+5:302023-03-11T11:53:42+5:30

Sun Dried Homemade Potato Chips : अर्धवट उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि वेफर्समधलं पाणी काढून घ्या. एका साडीवर हे वेफर्स सुकवायला ठेवा.

Sun Dried Homemade Potato Chips : Homemade Crispy Wafers Using 1 kg of Potatoes see recipe | १ किलो बटाटे वापरून घरीच करा कुरकुरीत वेफर्स; ३ वर्ष खराब होणार नाहीत, पाहा सोपी रेसिपी

१ किलो बटाटे वापरून घरीच करा कुरकुरीत वेफर्स; ३ वर्ष खराब होणार नाहीत, पाहा सोपी रेसिपी

वर्षभर उपवासाच्या दिवसांना खाण्यासाठी काहींना काही स्नॅक्स लागतात. अशावेळी जर डब्ब्यात वर्षभराचा खाऊ भरून ठेवला असेल तर सतत बाहेरून विकत आणावं लागत नाही. (Homemade potato wafers) मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी किंवा टी टाईम स्नॅक्ससाठीसुद्धा घरीच वेफर्स असतील बाहेरचं खाण्याचे क्रेव्हिग्स होणार नाहीत. (Sun Dried Homemade Potato Chips) बटाट्याचे खमंग, पांढरेशुभ्र वेफर्स बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. एकदा हे वेफर्स बनवल्यानंतर वर्षानुवर्ष खराब होत नाहीत. फक्त अर्धा ते एक तास काढल्यास तुम्हाला घरीच हा पदार्थ तयार करता येईल. (How to make potato wafers at home)

बटाटा वेफर्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी बटाट्याचे साल चॉपरच्या साहाय्यानं काढून घ्या.  त्यानंतर बटाट्याचे स्लाईज करून पाण्यात घाला. सर्व बटाटे किसून झाल्यानंतर त्यात अजून पाणी घाला. एका भांड्यात स्वच्छ पाणी उकळायला ठेवून त्यात हे बटाट्याचे स्लाईज घाला.

केरळ स्टाइल परफेक्ट अप्पम करण्याची रेसिपी, नाश्त्यालाच नाही तर रात्रीच्या जेवणासाठी उत्तम

अर्धवट उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि वेफर्समधलं पाणी काढून घ्या. एका साडीवर हे वेफर्स सुकवायला ठेवा. १ ते २ दिवस कडक उन्हात हे वेफर्स सुकवल्यानतंर तळून घ्या.  तयार आहेत खमंग, कुरकुरीत घरगुती वेफर्स.  यावर आवडीनुसार लाल चटणी घालून किंवा सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता.

Web Title: Sun Dried Homemade Potato Chips : Homemade Crispy Wafers Using 1 kg of Potatoes see recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.