Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळा स्पेशल कलिंगड पुदिना सरबत- फाइव्हस्टार चव आणि करायला अगदी सोपे-पोटासाठी गारेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2026 17:03 IST

Summer Special watermelon Mint cooler - Five Star Taste and Very Easy to Make - Soothing for the Stomach : चविष्ट आणि थंडावा देणारे पेयं . कलिंगडाचे कुलर करा घरीच.

उन्हाळ्यात सतत काहीतरी थंड आणि ताजेतवाने पिण्याची इच्छा होत असते. वाढत्या तापमानामुळे शरीरातून घाम जास्त प्रमाणात बाहेर पडतो आणि त्यामुळे थकवा, डिहायड्रेशन किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. अशावेळी घरच्या घरी तयार केलेली नैसर्गिक पेये शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Summer Special watermelon Mint cooler - Five Star Taste and Very Easy to Make - Soothing for the Stomach)अशी अनेक पेयं आहेत त्यापैकी एक म्हणजे कलिंगडाचा ज्यूस. कलिंगडासारखंच पुदिनाही उन्हाळ्यात आहारात असावा. या दोन्ही पौष्टिक पदार्थांचा एकत्र कलेला ज्यूस जास्त चविष्ट लागतो.  कलिंगड आणि पुदिन्यापासून तयार केलेले ड्रिंक हे उन्हाळ्यासाठी खास मानले जाते. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, तर पुदिना शरीराला थंडावा देण्यास मदत करतो.

हे ड्रिंक तयार करण्यासाठी कलिंगडाचे तुकडे, काही पुदिन्याची पाने, एक चमचा लिंबाचा रस, चवीनुसार साखर घ्या. जर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर साखर वापरणे टाळा. त्याशिवायही चव छान लागते. कारण कलिंगड मुळात गोडच असते. चिमूटभर काळं मीठ आणि थोडे बर्फाचे तुकडे घ्या. सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून छान ब्लेंड करून घ्या. त्यानंतर मिश्रण गाळून ग्लासमध्ये सर्व्ह कराव. वरून काही पुदिन्याची पाने घातल्यास चव आणि सुगंध अधिक छान होईल.

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे ड्रिंक शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करू शकते. उन्हामुळे होणारा थकवा कमी करण्यासाठी आणि शरीराला ताजेतवाने वाटण्यासाठी हे पेय उपयोगी ठरू शकते. बाहेरून विकत घेऊन थंड पेये पिण्यापेक्षा घरगुती पद्धतीने तयार केलेले हे ड्रिंक अधिक हलके आणि नैसर्गिक वाटते.

पुदिना पचनासाठी चांगला मानला जातो. त्यामुळे उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता किंवा जडपणा कमी वाटण्यास मदत होऊ शकते. लिंबामुळे ड्रिंकला हलकी आंबट-गोड चव मिळते आणि ताजेपणा जाणवतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी, पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी आणि चवदार पेयाचा आनंद घेण्यासाठी कलिंगड-पुदिना ड्रिंक हा उत्तम पर्याय ठरू शकतो. शिवाय छान आकर्षक रंगामुळे लहान मुलेही आवडीने पितात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Watermelon Mint Cooler: Easy, Refreshing Summer Drink for Hydration

Web Summary : Beat the summer heat with this simple watermelon mint cooler. It's hydrating, refreshing, and easy to make at home with just a few ingredients. Enjoy its cooling and digestive benefits.
टॅग्स :समर स्पेशलउन्हाळापाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआहार योजना