Join us
Daily Top 2Weekly Top 5

Summer Special : फक्त ५ मिनिटांत करा काकडीची तांबुली, काकडीची कढी-चव पारंपरिक उन्हाळी गारव्याची..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2026 15:49 IST

Summer Special: Make cucumber tambli, cucumber recipe in just 5 minutes -South Indian food : उन्हाळ्यात खा गारेगार तांबुली . काकडीची खास रेसिपी.

काकडीची तांबुली हा दक्षिण भारतीय, विशेषतः कर्नाटक भागातील एक पारंपरिक आणि अतिशय थंडावा देणारा पदार्थ आहे.  काकडी आणि दही दोन्ही असल्यामुळे हा पदार्थ उन्हाळ्यात खाल्ला जातो.  काकडीची तांबुली चवीला तर मस्त असतेच थोडी आंबट आणि सौम्य असते. यामध्ये दह्याचा वापर असल्यामुळे त्याला वेगळीच चव येते. (Summer Special: Make cucumber tambli, cucumber recipe in just 5 minutes -South Indian food :    )टेक्स्चरही छान मिळते. खूप तिखट किंवा मसालेदार नसल्यामुळे हा पदार्थ पोटाला आराम देणारा मानला जातो. गरम हवामानात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अशा प्रकारचे पदार्थ आहारात घेतले जातात. आरोग्याच्या दृष्टीने पाहीले तर काकडीची तांबुली पचनासाठी चांगली मानली जाते. काकडीमुळे शरीराला हायड्रेशन मिळते, तर दह्यामुळे पोटातील चांगले जिवाणू वाढण्यास मदत होते. त्यामुळे हा पदार्थ हलका, पौष्टिक आणि पोटासाठी हितकारक ठरतो. करायला अगदीच सोपा आहे. 

साहित्य काकडी, लसूण, हिरवी मिरची, जिरे, तेल, सुकी लाल मिरची, दही, पाणी, कडीपत्ता, मीठ, ओलं खोबरं, कोथिंबीर

कृती१. ताजी छान गोड काकडी सोलून घ्यायची. तिचे तुकडे करायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. ताजा नारळ खवायचा.  एका मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं घ्यायचं. त्यात काकडीचे तुकडे घालायचे. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. निवडलेली आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालायची. थोडं मीठ घालायचं आणि अगदी थोडं पाणी घालायचं. वाटून पेस्ट तयार करायची. मस्त एकजीव करायची. 

२. एका पातेल्यात दही घ्यायचं. त्यात पाणी आणि मीठ  घालायचं. व्यवस्थित घुसळून घ्यायचं. घट्ट ताक तयार करायचं जास्त पातळ नको. ताकात तयार केलेली काकडीची पेस्ट ओतायची. पुन्हा घुसळून घ्यायचं. मस्त एकजीव करायचं. 

३. एका फोडणीपात्रात थोडं तेल घ्यायचं. तेल जरा गरम झालं की त्यात सुकी लाल मिरची घालायची. कडीपत्ता घालायचा. सोलून बारीक चिरलेली लसूण घालायची. जिरे घालायचे आणि परतून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात घालायची. फोडणी मस्त खमंग झाली की तयार मिश्रणात ओतायची. ढवळून फोडणी आणि तांबुली एकजीव करायचे.  भातावर ओतायचे आणि जरा मुरु द्यायचे. दोन ते तीन मिनिटांना खायची. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cool Cucumber Tambli: A 5-Minute Summer Recipe for Gut Health

Web Summary : Cucumber Tambli, a South Indian cooler, blends cucumber and yogurt for a refreshing summer dish. Easy to digest, it hydrates with cucumber and promotes gut health with yogurt. Ready in minutes, it's a light, nutritious, and stomach-friendly recipe perfect over rice.
टॅग्स :समर स्पेशलअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआहार योजना