'कांद्याची लस्सी' हे शीर्षक वाचून तुमच्या भुवया नक्कीच उडाल्या असतील! पण आपण कांद्याची दही घालून कोशिंबीर करतोच, त्यामुळे टेस्ट वाईट लागणार नाही असा विचार मनात डोकावला. पण लस्सी म्हटल्यावर ती गोड अपेक्षित असणारच, मात्र वाढत्या उन्हाळ्यात हेल्दी आणि डाएट फ्रेंडली रेसिपीचा पर्याय मिळणार असेल तर?
उन्हाळ्याच्या वाढत्या लाटेत शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यासाठी आपण अनेकदा लिंबू सरबत किंवा ताक पितो. पण या उन्हाळ्यात काहीतरी वेगळं आणि आरोग्यदायी ट्राय करायचं असेल, तर 'पांढऱ्या कांद्याची लस्सी' हा एक उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी खास 'भोजन कुतूहलम' या आयुर्वेदिक आणि पारंपरिक रेसिपीच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे, जिथे आपल्या संस्कृतीतील विस्मरणात गेलेल्या आरोग्यदायी पदार्थांची माहिती दिली जाते.
आयुर्वेदात पांढऱ्या कांद्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात तो वरदान ठरतो. पांढरा कांदा गुणधर्माने शीतल (Cooling) असतो, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास तो मदत करतो. उन्हाळ्यात उष्माघाताचा (Heatstroke) त्रास टाळण्यासाठी पांढरा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय, पांढरा कांदा पचन सुधारण्यास मदत करतो आणि रक्ताभिसरण नियंत्रित ठेवतो. दह्यासोबत याचे सेवन केल्याने त्याचे गुणधर्म अधिक वाढतात आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. त्यामुळे जेवणात पांढरा कांदा समाविष्ट करा आणि पांढऱ्या कांद्याची लस्सीही शिकून घ्या.
साहित्य:
१ लहान पांढरा कांदा
१ मोठा चमचा दही
बारीक चिरलेली कोथिंबीर
साधे मीठ (चवीनुसार)
चिमुटभर काळं मीठ
चिमुटभर साखर
चिमुटभर सुंठ पावडर
कृती:
१. सर्वात आधी पांढरा कांदा व्यवस्थित किसून घ्या.
२. एका ग्लासमध्ये दही घेऊन त्यात थोडे पाणी टाका आणि ते घुसळून किंवा नीट मिक्स करून घ्या.
३. या दह्याच्या मिश्रणात किसलेला पांढरा कांदा आणि त्याचा रस एकत्र करा.
४. आता त्यात चवीनुसार साधे मीठ, काळं मीठ, साखर आणि सुंठ पावडर टाका.
५. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा.
६. उन्हाळ्याच्या दुपारी शरीराला थंडावा देण्यासाठी ही थंडगार लस्सी तयार आहे! पाहा व्हिडिओ -
Web Summary : Beat the heat with a unique and healthy white onion lassi! This Ayurvedic recipe uses white onion, known for its cooling properties, blended with yogurt and spices for a refreshing and energy-boosting summer drink. It aids digestion and helps prevent heatstroke.
Web Summary : गर्मी को मात देने के लिए प्याज की लस्सी आजमाएं! आयुर्वेद में प्याज शीतल माना जाता है। दही और मसालों के मिश्रण से बनी यह लस्सी ताजगी और ऊर्जा से भरपूर है। यह पाचन में सहायक और लू से बचाने में मददगार है।