आंब्याचे विविध पदार्थ करुन खायची मजाच काही वेगळी असते. नुसता आंबा खायला छान लागतोच. मात्र त्याचे पदार्थही छान लागतात. आंबरस तर आवडीने खातच असाल पण कधी आंब्याची पोळी खाल्ली का? साठे नाही तर पुरणपोळीसारखी केली जाते. (Summer Special: Easy recipe for making sweet mango roti, eat it with ghee and milk, must try recipe)अगदी सोपी रेसिपी आहे. चवीला फारच मस्त लागते. खमंग आणि खुसखुशीत होते. त्यामुळे नक्की करुन पाहा.
साहित्य
आंबा, कणीक, मीठ, हळद, पाणी, तूप, रवा, दूध, वेलची पूड, जायफळ पूड
कृती
१. एका परातीत थोडी कणीक घ्यायची. त्यात चमचाभर हळद घालायची. तसेच अगदी थोडं मीठ घालायचं. गरम केलेलं तूप घालायचं. हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. मळताना चिमूटभर मीठ घालायचं. कणीक जशी नेहमी मळता तसेच मळा. मस्त मऊ कणीक मळून झाल्यावर झाकून ठेवा.
२. आंब्याचा गर काढून घ्यायचा. एका कढईत थोडं तूप घ्यायचं. तुपावर थोडा रवा परतून घ्यायचा. रवा छान परतून झाला की त्यात आंब्याचा रस घाला. ढवळून घ्यायचे आणि त्यात दूध घालायचे. थोडी वेलची पूड घालायची. जायफळ पूडही घालायची. ढवळून घ्यायचे मस्त छान घट्ट तयार करायचे.
३. परातीत काढून घ्यायचे. गार झाले की हाताने मळून घ्यायचे. पोळी लाटण्यासाठी गोळे तयार करायचे. तयार सारणाचे गोळे त्यात भरायचे. पुरणपोळीसाठी जसं सारण भरता तसंच भरुन घ्यायचं. मस्त लाटून घ्यायचे. तवा गरम करायचा त्यावर पोळी परतायची. तुपावर खमंग परतायची.
