पिझ्झा लहान मुलांना आवडतो. लहानच काय मोठ्यांनाही फार आवडतो. मात्र पिझ्झा मैद्याचा असतो. त्यात यीस्टही असतं. त्यामुळे आरोग्यासाठी तो चांगला ठरत नाही. मात्र त्याच चवीचा मस्त पिझ्झा हेल्दी पद्धतीनेही करता येतो. रेसिपी अगदी सोपी आहे. (Summer Recipes - make healthy pizza at home , children will love it )मुलांना कळणारही नाही की ते पौष्टिक पदार्थ खात आहेत. पाहा हेल्दी रेसिपी कसा करायचा. भाज्या तुमच्या आवडीच्या वापरु शकता.
साहित्य कणीक, मीठ, तेल, बेकींग सोडा, दही, टोमॅटो, पाणी, काश्मीरी लाल मिरची, चीज, पनीर, साखर, सिमला मिरची, कांदा
कृती१. एका खोलगट भांड्यात कणीक घ्यायची. त्यात थोडं मीठ घालायचं. अगदी थोडी साखर घालायची. चमचाभर तेल घालायचं. थोडा बेकींग सोडा घालायचा. त्यात पाणी न वापरता दही वापरुन पीठ मळून घ्यायचं. १५ ते २० मिनिटे झाकून ठेवायचे. मस्त पीठ तयार होते. हाताने जरा मळून घ्यायचे आणि मग एका ताटलीत पसरवून घ्यायचे.
२. कांदा चिरुन घ्यायचा. चौकोनी तुकडे करायचे. तसेच सिमला मिरचीही तशीच चिरुन घ्यायची. पनीरचेही चौकोनी तुकडे करायचे. पॅनमध्ये चमचाभर तेलावर परतून घ्यायचे.
३. टोमॅटो उकळायचे. त्याची सालं काढायची. टोमॅटो सोबत एक लाल सुकी मिरचीही उकळायची. थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून त्याची चटणी तयार करायची. चवीनुसार मीठ घालायचे.
४. पिझ्झा बेसला चटणी लावायची. त्यावर कांदा लावायचा. सिमला मिरचीचे तुकडे लावायचे. पनीरचे तुकडेही लावायचे. चीज किसून घालायचे. सगळे तयार झाल्यावर एका कढईत थोडं मीठ घ्यायचं आणि कढई गरम करायची. कढई गरम झाल्यावर त्यात एक ताटली उलटी ठेवायची आणि त्या पिझ्झा ठेवायचा. त्यावर झाकण ठेवायचं आणि २० मिनिटे बेक करायचं. गरमागरम पिझ्झा खायचा.
Web Summary : Make healthy pizza at home without maida, using wheat flour, vegetables, and homemade tomato sauce. A delicious and nutritious alternative to store-bought pizza that kids will love.
Web Summary : मैदा के बिना, गेहूं का आटा, सब्जियां और घर का बना टमाटर सॉस का उपयोग करके घर पर हेल्दी पिज्जा बनाएं। यह बच्चों को पसंद आने वाला बाजार के पिज्जा का स्वादिष्ट और पौष्टिक विकल्प है।