Join us
Daily Top 2Weekly Top 5

Summer Food - थंडगार दही पोहे नाश्त्याला मिळाले तर दिवस नक्कीच आनंदात जातो, पाहा खास थंडावा देणारा पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 14:23 IST

Summer Food - If you have cold curd poha for breakfast it will help you stay hydrated, see this special cooling dish : दही पोहे खाणे आरोग्यासाठी चांगले आणि पोटासाठी हलके.

उन्हाळ्यात आहारात असायलाच हवे असे अनेक पदार्थ आहेत त्यापैकी एक म्हणजे दही. थंडावा देण्यासाठी सोपा आणि चविष्ट उपाय म्हणजे दही. दुपारी मस्त ग्लासभर ताक प्यायल्यावर जे समाधान शरीराला मिळंत ते सोडायुक्त कोल्ड ड्रिंक्समध्ये अजिबात नाही. तसेच दह्याचे विविध पदार्थ उन्हाळ्यात खावे. पचनासाठी ते फार चांगले असतात. (Summer Food - If you have cold curd poha for breakfast it will help you stay hydrated, see this special cooling dish)पोटही साफ राहते आणि पित्तही होत नाही. असाच एक पोटाला बरा वाटणारा पदार्थ म्हणजे दही पोहे. घरोघरी करण्याची पद्धत वेगळीच. एकदा या पद्धतीने करुन पाहा. 

साहित्य पोहे, दही, हिरवी मिरची, जिरे, तेल, मोहरी, शेंगदाणे, कडीपत्ता, पाणी, मीठ, उडीद डाळ, हिंग, सुकी लाल मिरची, कोथिंबीर 

कृती१. पोहे स्वच्छ धुवायचे. थोड्या पाण्यात भिजवायचे. छान ताजे दही फेटून घ्यायचे. मऊसर झाले की पोह्यात ओतायचे. मिक्स करायचे आणि थोडावेळ झाकून ठेवायचे. 

२. एका फोडणीपात्रात तेल घ्यायचे. त्यात मोहरी घालायची , मोहरी तडतडली की त्यात जिरे घालायचे. जिरे मस्त परतून घ्यायचे. मग त्यात कडीपत्ता घालायचा. तसेच भिजवलेली उडदाची डाळ घालायची आणि डाळ परतून घ्यायची. सुक्या लाल मिरचीचे तुकडे घालायचे. मस्त परतायचे. नंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे ते ही  परतून घ्यायचे. चमचाभर हिंग घाला आणि गॅस बंद करा. 

३. शेंगदाणे तेलावर परतून घ्यायचे. ताजी कोथिंबीर मस्त बारीक चिरायची. पोह्यांत घालायची. त्यात तयार केलेली फोडणी घालायची तसेच शेंगदाणेही घालायचे आणि पोहे मिक्स करायचे. अगदीच लगदा झाला असेल किंवा सुके राहत असतील तर थोडं ताक तयार करुन घालायचं. म्हणजे पोहे सुके राहणार नाहीत. चवीला मस्त लागतात आणि पोटालाही आराम मिळतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cool Curd Poha: Perfect Summer Breakfast for a Refreshing Day

Web Summary : Curd poha is a cooling, digestible summer dish. To prepare, soak poha, mix with yogurt. Add a tempering of mustard seeds, cumin, curry leaves, and lentils. Garnish with peanuts and coriander. Adjust consistency with buttermilk for a delicious, soothing meal.
टॅग्स :समर स्पेशलअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआहार योजना