Join us

आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:25 IST

साखर, मीठ आणि तेल, या तिन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक आहेत. अनेकदा डॉक्टर आणि फिटनेस तज्ज्ञ आपल्याला आपल्या आहारातून वगळण्याचा किंवा कमी करण्याचा सल्ला देतात.

भारतीय जेवणात साखर, मीठ आणि तेल वापरणं सामान्य आहे. त्याच्याशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. ऑफिस असो वा घर, लोक गोड, खारट पदार्थ आणि तेलात तळलेले पदार्थ खातात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या तिन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात. साखर, मीठ आणि तेल, या तिन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक आहेत. अनेकदा डॉक्टर आणि फिटनेस तज्ज्ञ आपल्याला आपल्या आहारातून वगळण्याचा किंवा कमी करण्याचा सल्ला देतात. कारण गोड, खारट आणि तळलेले पदार्थ खाण्याची आपली सवय आपल्याला हळूहळू लठ्ठपणा, हाय ब्लडप्रेशर, डायबेटीस आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढवते.

जीवा आयुर्वेदाचे संस्थापक आणि संचालक डॉ. प्रताप चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे टेन्शन, लठ्ठपणा, हाय ब्लडप्रेशर आणि डायबेटीससारखे आजार होतात. हेच कारण आहे की, अलिकडच्या अपडेटमध्ये साखर आणि अनहेल्दी फॅट्स मर्यादित करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे आणि त्यासोबतच फायबर, फळं आणि भाज्यांचे सेवन वाढवण्यास सांगण्यात आलं आहे.

साखरेचं योग्य प्रमाण 

WHO च्या सल्ल्यानुसार, एकूण कॅलरीजपैकी १० टक्क्यांपेक्षा कमी कॅलरीज 'फ्री शुगर'मधून मिळायला हव्यात आणि जर ते ५% पेक्षा कमी केले तर ते आणखी चांगलं आहे. ICMR-NIN ची मार्गदर्शक तत्त्वे अशी आहेत की प्रौढ व्यक्तीने दररोज सुमारे २५ ग्रॅमपेक्षा जास्त म्हणजे ५-६ चमचे साखर खाऊ नये.

जास्त साखर खाण्याचे तोटे

- वजन वाढणे 

- डायबेटीसचा धोका.

- हार्ट डिसीज 

- हाय ब्लडप्रेशर

- दात किडणे

मिठाचं योग्य प्रमाण

स्वयंपाकघरात असलेल्या दोन्ही पांढऱ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. साखर आणि मीठ दोन्ही मर्यादित प्रमाणात खाणं योग्य आहे. या दोन्हींच्या अतिसेवनाचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. मीठ अन्नाची चव वाढवतं, परंतु त्याचे अतिसेवन आपल्या किडनी आणि लिव्हरवर परिणाम करतं. WHO आणि ICMR च्या सल्ल्यानुसार, दररोज ५ ग्रॅम मीठ खाणं योग्य आहे, म्हणजेच १ चमच्यापेक्षा कमी मीठ. 

जास्त मीठ खाण्याचे तोटे

- ब्लडप्रेशर वाढतं

- स्ट्रोकचा धोका

- किडनीचं नुकसान

तेलाचं योग्य प्रमाण

 स्वयंपाक करण्यासाठी तेल वापरलं जातं. ICMR आणि FSSAI नुसार, दररोज सुमारे ६ चमचे म्हणजेच २५-३० ग्रॅम तेल वापरावं. WHO असं मानतं की एकूण फॅट हे एकूण कॅलरीजच्या ३०% पेक्षा कमी, सॅच्युरेटेड फॅट १०% पेक्षा कमी आणि ट्रान्स फॅट १% पेक्षा कमी असावे.

जास्त तेल वापरण्याचे तोटे

- कोलेस्टेरॉल वाढणं 

- ब्लॉकेज

- हृदयरोग

- लठ्ठपणा आणि डायबेटीस 

टॅग्स :किचन टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स