Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sugar per day: दिवसभरात किती साखर खाता? साखर कधी खायची, कधी टाळायची; समोर आला WHO चा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 14:12 IST

Sugar per day : यूएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन प्रायोजित द इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार भारतात साखर खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते.  

ठळक मुद्देआपल्या स्वयंपाकघरात अशा प्रकारची खाद्यपदार्थ भरा. ज्यामुळे तुमची साखर खाण्याची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला आरोग्य मिळेल. यात आपण ड्राय फ्रुट्स, फळं, धान्य, बियाणांचा समावेश करू शकता.टाइप 2 डायबिटीजला साधारण भाषेत शुगर असं म्हटलं जातं. अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे या प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो.

भारतात बनवले जाणारे गोड पदार्थं  क्वचित जगभरात बनवले जातात. आपल्या देशातील ग्रामीण ते शहरी भागात वाढदिवस, विवाहसोहळे किंवा इतर कोणतेही उत्सव असोत, या सर्वांमध्ये नक्कीच काहीतरी गोड असते. एवढेच नाही तर  ते खाल्ल्यानंतर आपल्याला बर्‍याचदा गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. या सर्व गोड पदार्थांमध्ये टेबल शुगर, ग्रेन्यूलेटेड शुगर या रेगुलर शुगर या साखरेच्या प्रकारांचा वापर केला जातो.

यूएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन प्रायोजित द इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार भारतात साखर मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते.  या अलीकडील अभ्यासाचे लेखक, राजीव दासगुप्ता, राकेश पिल्लाई, राकेश कुमार आणि नरेंद्र के अरोड़ा मायकेल मॉस यांनी 'साल्ट शुगर फॅट' उल्लेख केला आहे. या लेखात साखर आणि तंबाखूच्या संदर्भाची चर्चा केली आहे. साखर आणि तंबाखूमुळे मेंदूत सारख्याच प्रकारच्या रसायनांचे उत्पादन होऊ शकते हे त्याला डोपामाईन असं म्हणतात.  भारतात साखरेचं सेवन मोठ्या प्रमाणावर केलं जात ते धोकादायक ठरू शकते. 

आकडेवारी काय सांगते?

२०१० मध्येच भारतातील दरडोई साखरेचा वापर सुमारे ५५ ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. तर सन २००० मध्ये, हा वापर प्रति व्यक्ती फक्त २२ ग्रॅम होता. त्याच्या थेट अंदाजानुसार असे म्हटले जाते की एखादी व्यक्ती दर वर्षी भारतात सुमारे १८ किलो साखर वापरते. इतकेच नाही तर मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार हे दर वर्षी भारतात होत असलेल्या ८० टक्के मृत्यूंचे कारण आहेत. हे सर्व रोग कोणत्या ना कोणत्या मार्गानं साखरेशी संबंधित आहेत.

साखरेच्या अतिसेवनानं होणारे आजार

टाइप 2 डायबिटीजला साधारण भाषेत शुगर असं म्हटलं जातं. अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे या प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. आंतरराष्ट्रीय डायबिटीज फेडरेशनच्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये भारतात जवळपास  ७२ लाखांपेक्षा जास्त डायबिटीजचे रुग्ण सापडले आहेत. २०४५ पर्यंत  डायबिटीसच्या केसेस दुप्पट होण्याची शक्यता आहे. रोजच्या आहारात साखरेचे अतिसेवन पँक्रियाज इंसुलिनचे जास्त प्रमाणात उत्पादन करण्यास फायद्याचे ठरते. 

रोज किती गोड खायला हवं?

जर तुम्हाला असा विचार येत असेल की एका दिवसात किती गोड पदार्थ खाल्ले जाऊ शकतात तर तज्ज्ञही याचे उत्तर देत आहेत. तज्ञांच्या मते लठ्ठपणा आणि मधुमेह यासारखे आजार टाळण्यासाठी, पदार्थ आणि पेयांचा वापर मर्यादित करा. लक्षात ठेवा की आपण नैसर्गिक साखर असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे जसे की फळे, भाज्या, संपूर्ण धान्य इ. याच संशोधक रामिनेनी यांनी आपल्या लेखात लिहिले आहे की निरोगी राहण्यासाठी, शक्य तितक्या साखरेपासून बनवलेल्या पदार्थांपासून दूर रहा. आपण नैसर्गिक साखरेचे पदार्थ खाऊ शकता.

रिफाईंड साखरेला पर्यायी कोणत्या पदार्थांचे सेवन करावं?

आपल्या स्वयंपाकघरात अशा प्रकारची खाद्यपदार्थ भरा. ज्यामुळे तुमची साखर खाण्याची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला आरोग्य मिळेल. यात आपण ड्राय फ्रुट्स, फळं, धान्यांचा समावेश करू शकता. आपण रिफाईन साखरेपासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन करणे थांबवताच काही दिवसांनी तुम्हाला याची सवय होईल आणि साखरेचं सेवन नियंत्रणात ठेवाल.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्नजागतिक आरोग्य संघटनातज्ज्ञांचा सल्ला