पालक ही पालेभाजी लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्व ए, सी, आणि के यांचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे रक्तवाढ, हाडांची मजबुती, त्वचेचा पोत आणि पचनशक्ती यासाठी ती फार उपयुक्त मानली जाते. ग्रामीण भागात असो वा शहरात, पालक बाजारात सहज उपलब्ध असल्याने ती बहुतेक वेळा आठवड्यातून एकदा तरी जेवणात आवर्जून केली पाहिजे.(spinach curry recipe, it tastes delicious, see the traditional spinach vegetable recipe - easy to make) पालेभाज्या खाण्यासाठी मुलं नाही म्हणतात, मात्र पालक चवीला छान असतो. त्यामुळे मुलांना नक्कीच द्या. एकदा पालकाची अशी पातळ भाजी करा. नक्की आवडेल.
साहित्य
शेंगदाणे, पालक, पाणी, चिंच, बेसन, आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, लाल तिखट, चणाडाळ, जिरे, हळद, गरम मसाला
कृती
१. पालकाची जुडी स्वच्छ धुवायची. व्यवस्थित चिरुन घ्यायची. वाटीभर चणाडाळ , वाटीभर शेंगदाणे आणि पालक एका कुकरमध्ये घ्यायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. त्याही त्यात घाला. पाणी घाला. चमचाभर मीठ घाला , चमचाभर हळद घाला आणि कुकर लावा. छान शिजवून घ्या.
२. चिंच गरम पाण्यात भिजवा. १० मिनिटे ठेवा आणि नंतर हाताने कुस्करुन घ्या, चोथा काढा, पाणी गाळून घ्या. चिंचेच्या पाण्यात चमचाभर बेसन घाला. छान एकजीव करा. त्यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची. हिरव्या मिरचीचे तुकडे करा, लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या आणि मिरची लसणाची पेस्ट करुन घ्या.
३. एका कढईत चमचाभर तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात चमचाभर जिरे घालायचे. जिरं तडतडल्यावर त्यात आलं- मिरची पेस्ट घाला आणि छान परतून घ्या. तसेच त्यात हळद आणि लाल तिखट घाला. तिखट करपण्याआधीच त्यात पालक, शेंगदाणे जे कुकरमध्ये शिजवले ते पाण्यासकट ओता. जरा उकळले की त्यात चिंच आणि बेसनाची पेस्ट ओता.
४. एका फोडणीपात्रात चमचाभर तेल घ्या. त्यात जिरे घाला गॅस बंद करा आणि लाल तिखट घाला. मस्त फोडणी भाजीवर ओता. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. चमचाभर गरम मसाला घाला. भाजी छान उकळू द्या.
